
भारतीय महिला संघाचं प्रदीर्घ कालावधीनंतर स्वप्न पूर्ण झालं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद 52 वर्षांनी मिळवलं आहे. वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताला यापूर्वी 2005 आणि 2017 साली जेतेपदाची संधी होती. पण दोन्ही वेळेस भारताच्या पदरी निराश पडली. पण यंदाच्या पर्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने जेतेपद मिळवलं आणि स्वप्नपूर्ती केली. भारतीय महिला संघाने या विजयानंतर एक गाणं गायलं. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कारण हे गाणं चार वर्षांपूर्वी तयार केलं होतं. मात्र या दरम्यान तीन वर्ल्डकप गमावल्यानंतर आता कुठे विजयी गाणं गाण्याची संधी मिळाली. बीसीसीआयने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या गाण्याची रचना अप्रतिम असून प्रेरणादायी आहे. जेमिमा रॉड्रिग्सने या गाण्याची पार्श्वभूमी सांगितली आणि त्यानंतर संघाने गाण्यास सुरुवात केली.
जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली की, संघाने हे निश्चित केलं होतं की हे गाणं तेव्हाच जाहीर करायचं जेव्हा आपण पहिला वर्ल्डकप जिंकू. त्यानंतर संपूर्ण संघाने मिळून एका सुरात हे गाणं गायलं. ‘टीम इंडिया, टीम इंडिया, कर दें सबकी हवा टाइट, टीम इंडिया लड़ने आई है, कोई ना ले हमको लाइट, हमारा फ्यूचर है ब्राइट, ना लेगा कोई पंगा, कर देंगे हम दंगा…चांद पर चलेंगे, साथ में उठेंगे, हम हैं टीम इंडिया, हम साथ में जीतेंगे. ना लेगा कोई पंगा, कर देंगे हम दंगा. रहेगा सबसे ऊपर, हमारा तिरंग.हम हैं टीम इंडिया, हम हैं टीम इंडिया, हम हैं टीम इंडिया.’
𝐒𝐭𝐫𝐚𝐢𝐠𝐡𝐭 𝐟𝐫𝐨𝐦 𝐭𝐡𝐞 𝐡𝐞𝐚𝐫𝐭 💙
No better moment for the #WomenInBlue to unveil their team song. 🥳🎶#TeamIndia | #CWC25 | #Final | #INDvSA | #Champions pic.twitter.com/ah49KVTJTH
— BCCI Women (@BCCIWomen) November 3, 2025
भारतीय महिला संघाचा जेतेपदापर्यंत प्रवास खडतर होता. खरं तर उपांत्य फेरीचं गणितही भारताने काठावर पास केलं . त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं 338 धावांचं लक्ष्य म्हणजे सामना हातून गेला असंच वाटत होतं. पण भारतीय महिला संघाने सर्वांवर मात करत जेतेपदाची चव चाखली. भारतीय महिला क्रिकेट पर्वाची ही सुरुवात आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आतापर्यंत हा पुरूषांचा खेळ म्हणून दृष्टीकोन होता. मात्र आता महिलांनाही क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळणार आहे. खऱ्या अर्थाने हा वनडे वर्ल्डकप येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा असणार आहे. जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक क्रिकेटप्रेमी तरूणी भविष्यात क्रिकेटचे धडे गिरवतील.