AUS vs IND SF :Phoebe Litchfield ची शतकी खेळी, भारतासमोर 339 धावांचं आव्हान, कोण मिळवणार फायनलचं तिकीट?

Australia vs India Women 2nd Semi Final 1st Inning : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जोरदार फटकेबाजी करत टीम इंडिया विरुद्ध 338 रन्स केल्या. भारतीय संघाने अखेरच्या काही षटकांत झटपट झटके दिले आणि ऑस्ट्रेलियाला 350 धावांआधी रोखलं.

AUS vs IND SF :Phoebe Litchfield ची शतकी खेळी, भारतासमोर 339 धावांचं आव्हान, कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
Phoebe Litchfield Century
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 30, 2025 | 8:54 PM

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 339 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरआधी ऑलआऊट केलं. मात्र भारतीय गोलंदाज कांगारुंना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 338 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियासाठी ओपनर फोबी लिचफिल्ड हीने सर्वाधिक धावा केल्या. फोबी लिचफिल्ड हीने शतक झळकावलं. तर एलिसा पेरी आणि एश्ले गार्डनर या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तर भारतासाठी दीप्ती शर्मा आणि श्री चरणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी

ऑस्ट्रेलियाने महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने कॅप्टन एलिसा हीली आणि फोबी लिचफिल्ड ही जोडी 25 धावांवर फोडली. हीली 5 धावा करुन आऊट झाली. त्यानंतर फोबी आणि एलिसा पेरी या जोडीने भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या जवळ पोहचवलं. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. या दरम्यान फोबीने खणखणीत शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या विकेटसाठी 133 बॉलमध्ये 155 रन्स जोडल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा 180 स्कोअर असताना भारताने ही जोडी फोडली. अमनजोत कौरने फोबीला आऊट केलं. फोबीने 93 बॉलमध्ये 119 रन्स केल्या. फोबीने या खेळीत 3 सिक्स आणि 17 फोर लगावले.

टीम इंडियाचं कमबॅक

त्यानंतर एलीसा पेरी आणि बेथ मुनी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 100 च्या स्ट्राईक रेटने 40 बॉलमध्ये 40 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर बेथ मुनी 24 रन्सवर आऊट झाली. भारताने ऑस्ट्रेलियाला 45 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले. अनाबेल सदरलँड 3, एलिसा पेरी 77 आणि ताहिला मॅग्राथ 12 रन्स करुन आऊट झाल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 220-2 वरुन 6 आऊट 265 अशी झाली.

भारतासमोर 339 रन्सचं टार्गेट

ऑस्ट्रेलिया 300 पार

त्यानंतर किमा गार्थ आणि एश्ले गार्डनर या जोडीने सातव्या विकेटसाठी 66 रन्स जोडल्या आणि ऑस्ट्रेलियाला 330 पार पोहचवलं. गार्डनरने 63 रन्स केल्या. तर भारतीय गोलंदाजांनी अलाना किंग आणि सोफी मोलिनक्स या दोघींना झटपट आऊट केलं. अलानाने 4 धावा केल्या. तर सोफीला भोपळाही फोडून दिला नाही.  तर किम गार्थ हीला 17  धावांवर रनआऊट केलं. यासह ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला.  टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा आणि श्री चरणी व्यतिरिक्त क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.