Women’s World Cup: बांगलादेशने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 211 चेंडू खाल्ले! एका धावेसाठी दमछाक

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या आठव्या सामन्यात बांग्लादेश आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात बांगलादेशी फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगलंच झुंजवलं. एक धाव घेणंही बांगलादेशी फलंदाजांना कठीण झालं होतं.

Women’s World Cup: बांगलादेशने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 211 चेंडू खाल्ले! एका धावेसाठी दमछाक
Women’s World Cup: बांगलादेशने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 211 चेंडू खाल्ले! एका धावेसाठी दमछाक
Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 07, 2025 | 7:44 PM

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत असून गुणतालिकेत उलटफेर होताना दिसत आहे. या स्पर्धेतील आठवा सामना बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण बांगलादेशच्या फलंदाजांची फलंदाजी करताना दाणादाण उडाली. बांगलादेशचा संघ या सामन्यात पूर्णपणे दबावात खेळला. सामन्यातील निर्धाव चेंडूमुळेच हे चित्र स्पष्ट झालं आहे. कारण इंग्लंडच्या गोलंदाजांनी विकेट तर घेतल्या पण सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले. बांगलादेशने 49.4 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमवून 178 धावा केल्या. बांगलादेशने या धावा 89 चेंडूवर केल्या आहेत. म्हणजेच 211 चेंडू निर्धाव गेले.

बांगलादेशच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या 24 धावा असताना पहिली विकेट पडली. रुबया हैदर 9 चेंडूत 4 धावा करून बाद झाली. कर्णधार निगर सुल्तानाने 2 चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव करता आली नाही. सोभना मोस्तरीने 60 धावांची खेळी केली. पण 108 चेंडूंचा सामना केला. शोबा अक्तरने 23 चेंडूत 10, रितू मोनीने 36 चेंडूत 5, फहिमा खातुनने 25 चेंडूत 7, नहिदा अक्तरने 8 चेंडूत 1, मारुफा अक्तर पहिल्या चेंडूवर बाद, शन्जिदा अक्तर 7 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. रुबेया खान एकमेव फलंदाज ठरली जिने 27 चेंडूत 43 धावा केल्या. तर 17 धावा या अवांतर म्हणजे वाइड आणि लेग बाइजच्या रुपाने आल्या.

इंग्लंडकडून सोफी एक्सेलस्टन सर्वात प्रभावी गोलंदाज ठरली. तिने 10 षटकात फक्त 24 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं. तिने गोलंदाजीत 48 चेंडू निर्धाव टाकले. बांगलादेशने सोफीच्या 60 पैकी फक्त 12 चेंडूवर धावा काढला. दुसरीकडे, लिन्सी स्मिथ, चार्ली डीन आणि एलिस कॅप्सी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर लॉरेन बेलने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या फिरकीपटूंनी सर्वाधिक नुकसान केले. 10 पैकी नऊ बळी घेतले.