WTC Points Table : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये वेस्ट इंडिज पाकिस्तानच्या जवळ, भारत टॉप 3मध्ये कायम, जाणून घ्या पॉईंट्स टेबल

इंग्लंड आणि बांगलादेशचे संघ आधीच संपले आहेत. इंग्लंड 28.89 आणि न्यूझीलंड 25.93 टक्के गुणांसह अनुक्रमे 7व्या आणि 8व्या स्थानावर आहे. यादीत श्रीलंका 55.56 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

WTC Points Table : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये वेस्ट इंडिज पाकिस्तानच्या जवळ, भारत टॉप 3मध्ये कायम, जाणून घ्या पॉईंट्स टेबल
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Jun 28, 2022 | 7:04 AM

नवी दिल्ली : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 (World Test Championship) पॉइंट्स टेबलमध्ये (Points Table) बघितल्यास वेस्ट इंडिजने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा सफाया करून आपली स्थिती सुधारली आहे. बांगलादेशवर सलग दोन विजय मिळवून संघ इंडिज सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील चौथी मालिका पूर्ण केलीय. या मालिकेनंतर त्याला 50 टक्के गुण मिळाले असून तो पाकिस्तानच्या जवळ पोहोचला आहे. पाकिस्तान 52.38 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जर आपण बांगलादेशबद्दल बोललो तर हा संघ 13.33 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. आयपीएल प्रमाणेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील कोणता संघ कोणत्या स्थानी हे जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारत (Indian cricket team), वेस्ट इंडिजसह इतर संघ कोणत्याही स्थानी आहेत. ते सांगणार आहोत. जाणून घ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पॉईंट्स टेबल…

आयसीसीचं ट्विट

टॉप 3 मध्ये कोणते संघ?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे सध्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टॉप 3मध्ये कोणता संघ आहे. ते जाणून घेऊया. भारतीय क्रिकेट संघ, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीच्या गुणतालिकेत पहिल्या 3 मध्ये आहेत. टीम इंडिया 58.33 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका 71.43 गुणांसह दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया 75 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या यादीत श्रीलंका 55.56 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

जाणून घ्या पॉईट्स टेबल

न्यूझीलंडसह इंग्लंड-बांगलादेश बाहेर

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे पहिले विजेतेपद पटकावणारा न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्ध 0-3 अशा पराभवानंतर त्यांची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता नगण्य आहे. दुसरीकडे, इंग्लंड आणि बांगलादेशचे संघ आधीच संपले आहेत. इंग्लंड 28.89 आणि न्यूझीलंड 25.93 टक्के गुणांसह अनुक्रमे 7व्या आणि 8व्या स्थानावर आहे.

हे सुद्धा वाचा

अंतिम सामन्याचे ठिकाण निश्चित नाही

4 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेले दुसरे फेरी 31 मार्च 2023 रोजी संपेल. गेल्या वेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना द रोझ बाउल साउथॅम्प्टन येथे खेळला गेला होता. परंतु दुसऱ्या फेरीच्या अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप आयसीसीनं जाहीर केलेले नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें