ENG vs PAK : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी

| Updated on: Nov 10, 2023 | 4:56 PM

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीतील 44 वा सामना होणार आहे. या दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी मिळणे म्हणजे मोठा चमत्कारच ठरेल. इंग्लंडसाठी हा विजय महत्त्वाचा आहे.

ENG vs PAK : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
ENG vs PAK : इंग्लंड पाकिस्तान सामन्यात हे 11 खेळाडू करतील मालामाल! जाणून घ्या स्वप्नपूर्तीचं गणित
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. कारण या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या दृष्टीने इंग्लंडला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. टॉप 8 मध्ये राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकावाच लागेल. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार यात शंका नाही. वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 91 वेळा आमनेसामने आले आहेत. यात इंग्लंडने 56, तर पाकिस्तानने 32 सामन्यात विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. यात पाकिस्तानने 5, तर इंग्लंडने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना कोलकात्याच्या मैदानावर रंगणार आहे. हे मैदान फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी चांगलं आहे. त्यामुळे उत्कृष्ठ कामगिरी करणारा संघच बाजी मारेल. या मैदानावर आतापर्यंत 38 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात 22 वेळा पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 242 धावा करू शकतो. इडन गार्डन मैदानात स्वच्छ वातावरण असेल. त्यामुळे पावसाची कोणतीच शक्यता नाही. आर्द्रता 46 टक्क्यांपर्यंत असेल. तापमान 21 ते 32 डिग्रीच्या मधे असेल.

ड्रीम इलेव्हन

  • विकेटकीपर – मोहम्मद रिझवान
  • फलंदाज – बेन स्टोक्स, बाबर आज़म, डेविड मलान (उपकर्णधार), फखर जमान
  • अष्टपैलू – ख्रिस वोक्स (कर्णधार), इफ्तिखार अहमद
  • गोलंदाज- आदिल राशिद, डेविड विली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेविड विली, एटकिंसन, आदिल राशिद.

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम, हारिस रऊफ.