AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : दुखापत झाल्यानंतर खेळाडूंना देण्यात येणारी RICE थेरपी असते तरी काय? जाणून घ्या!

कोणताही खेळाडू दुखापती झाल्यावर एक माणूस किट घेऊन पळत येतो आणि उपचार करायला सुरूवात करतो. यावेळी नेमके कोणते उपचार केले जातात जाणून घ्या. यामध्ये RICE थेरपीचाही समावेश असतो, ही थेरपी कशी असते याबद्दल माहिती करून घ्या.

World Cup 2023 : दुखापत झाल्यानंतर खेळाडूंना देण्यात येणारी RICE थेरपी असते तरी काय? जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 21, 2023 | 10:56 AM
Share

मुंबई : सध्या वर्ल्ड कप 2023 चालू आहे. तर अनेक सामन्यांदरम्यान काही खेळाडूंना दुखापत झाल्याचं आपण पाहिलं आहे. यामध्ये आता भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापत झाली आहे. हार्दिकप्रमाणे इतर कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यानंतर तातडीने कोणीतरी मैदानावर येतो आणि जखमी खेळाडूवर उपचार करतो. तर बहुतेक जणांना प्रश्न पडला असेलच की खेळाडूंवर तातडीनं नेमके काय उपचार केला जातो? तर आता आपण याबाबत जाणून घेणार आहोत. सोबतच आपण काही अशा सामान्य दुखापतींबाबत जाणून घेणार आहोत ज्याचा खेळाडूंना सामना करावा लागतो.

मैदानात खेळाडूंना या दुखापती होतातच!

– बर्‍याचदा खेळाडूंना नाकाच्या दुखापतीचा सामना करावा लागतो. यामध्ये खेळाडूच्या नाकातून रक्त येणे किंवा नाकाचे हाड तुटणे अशा समस्या निर्माण होतात. नाकाची समस्या खेळाडूंच्या सामान्य दुखापतींपैकी एक आहे.

– खेळाडूंची सर्वात सामान्य दुखापत म्हणजे पायाला चमक येणे. बऱ्याचदा सामन्यादरम्यान खेळाडूंचा पाय चमकतो किंवा मुरगळतो, तर ही अगदी सामान्य दुखापत मानले जाते.

– सामन्यादरम्यान जोरात धावल्यामुळे किंवा उडी मारल्यामुळे फ्रॅक्चरची समस्या निर्माण होताना दिसते. अनेक खेळाडूंना या समस्येचा सामना करावा लागला आहे.

– बऱ्याच खेळाडूंच्या गुडघ्याच्या सांध्याला दुखापतीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या देखील खेळाडूंच्या सामान्य दुखापतींपैकी एक आहे.

बऱ्याचदा जोरात झटका बसल्यामुळे स्नायू फाटण्याची समस्या देखील खेळाडूंमध्ये निर्माण होते. ही समस्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात त्रास देते.

खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर काय उपचार केला जातो?

सामन्यादरम्यान खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर RICE ही थेरेपी दिली जाते. RICE म्हणजे Rest, Ice, Compression, Elevation

विश्रांती (Rest) – खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर त्यांना विश्रांती दिली जाते. खेळाडूला जिथे जखम झाली आहे त्या भागाला आधार देऊन खेळाडूला विश्रांती दिली जाते. तसंच 48-72 तास दुखापत झालेल्या भागांना वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाते.

बर्फ (Ice) – खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर 48-72 तासांमध्ये दर दोन तासांनी झालेल्या जखमेवर बर्फ लावला जातो. यामुळे खेळाडूंना आराम मिळतो.

कम्प्रेशन (Compression) – खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर त्यांच्या वेदनादायक भागावर लवचिक पट्टी लावली जाते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

उंची (Elevation) – जेव्हाही खेळाडूला दुखापत होते तेव्हा त्यांचा दुखापतग्रस्त भाग त्यांच्या हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवला जातो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?