
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 50 षटकात 9 गडी गमवून 364 धावा केल्या आणि विजयासाठी 365 धावांचं आव्हान दिलं.

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेविड मलान याने 91 चेंडूत शतक पूर्ण केलं. धर्मशाळा मैदानावर वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतक आहे.

डेविड मलान याचं वनडे करिअरमधील हे सहावं शतक आहे. या सोबत वनडे फॉर्मेटमध्ये सर्वात वेगाने सहा शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे.

डेविड मलान याने 6 शतक करण्यासाठी 23 डाव घेतले. यापूर्वी हा रेकॉर्ड इाम उल हक याच्या नावावर होता. त्याने 27 डावात ही कामगिरी केली होती.

मलान याने जॉनी बेयरस्टो यांच्या एका वर्षात सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मलानने 2023 या वर्षात 4 शतकं केली आहेत. तर बेयरस्टोने 2018 मध्ये अशीच कमागिरी केली होती.

डेविड मलान याने 140 धावांसह इंग्लंडसाठी वर्ल्डकप इतिहासात सर्वात मोठं शतक ठोकणाऱ्या खेळाडूत सहभागी झाला आहे. अँड्र्यू स्ट्रॉस 158, जेसन रॉय 153 आणि इयोन मॉर्गन 148 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. डेविड मलान 140 धावांसह चौथ्या स्थानी आहे. (Photo : Twitter)