World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांना सुरूवात, कुठे पाहताल लाईव्ह मॅच, जाणून घ्या!

सराव सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. शुक्रवार म्हणजे आज तीन सराव सामने होणार आहेत. हे सराव सामने तुम्हाला कुठे पाहता येणार आहेत. सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर!

World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांना सुरूवात, कुठे पाहताल लाईव्ह मॅच, जाणून घ्या!
| Updated on: Sep 29, 2023 | 10:29 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 च्या थराला अगदी काही दिवस बाकी आहेत. आता प्रत्येक संघाने आपल्या स्कॉडची घोषणा केली असून 5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर याआधी सर्व संघांचे दोन सराव सामने होणार आहेत. या सराव सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. शुक्रवार म्हणजे आज तीन सराव सामने होणार असून हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तानचा न्यूझीलंडसोबत सामना आहे. तर श्रीलंका आणि बांगलादेश आणि अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका ही एकमेकांसोबत भेटणार आहे.

हे सामने कुठे पाहता येणार?

आज पासून सुरू झालेले सराव सामने हे याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार आहे?, असा प्रश्न चाहत्यांना पडला असावा तर हे सराव सामने Disney+ Hotstar ॲपवर तुम्हाला पाहता येणार आहेत. त्यासोबतच टीव्हीवर या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर पाहता येतील.

 

भारताचा सराव सामना कधी?

भारतीय संघाचे ही दोन सराव सामने होणार आहेत. 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर रोजी सराव सामने खेळवले जाणार आहे तर भारताचा पहिला सराव सामना 30 सप्टेंबरला इंग्लंड विरुद्ध होणार आहे. तर भारताचा दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबरला नेदरलँड संघासोबत होणार आहे.दोन्ही सराव सामने गुवाहाटीमध्ये होणार आहेत.

दरम्यान, भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये बदल करण्यात आला आहे. ऑल राऊंडर अक्षर पटेल याच्या जागी अनुभवी स्पिनर आर अश्विन याला संधी देण्यात आली आहे. अश्विनचा अनुभव पाहता त्याच्याकडे आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील अनुभवाची शिदोरी आहे. भारताला अनेकदा विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका आणि निभावली आहे.  त्यामुळे ऑफ स्पिनर असलेला अश्विन विरोधी संघांसाठी डोकेदुखी ठरवू शकतो.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ :-

रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन, सूर्यकुमार यादव.