AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 विजेत्यावर पैशांचा पाऊस, उपविजेत्या संघाचीही होणार चांदी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना 11 जूनला लॉर्ड्स मैदानात होणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे विजेत्या संघाची चांदी होणार आहे.

आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 विजेत्यावर पैशांचा पाऊस, उपविजेत्या संघाचीही होणार चांदी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 15, 2025 | 3:54 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स 2023-2025 स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनला होणार आहे. मागच्या दोन वर्षात एकूण नऊ संघात अंतिम फेरीत जागा मिळण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत जागा मिळवली असून आता जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता आहे. लॉर्ड्स मैदानात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. पण तिसऱ्या पर्वात मिळणाऱ्या बक्षिसाची मागच्या पर्वाच्या तुलनेत दुप्पट आहे. अंतिम सामन्यासाठी 5.76 मिलियन अमेरिकन डॉलरची बक्षिसी रक्कम जाहीर केली आहे. जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 3.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 30.78 कोटी रुपये मिळणार आहेत. तर मागच्या पर्वात हीच रक्कम 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर होती. तर उपविजेत्या संघाला 2.16 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी बक्षिसी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच 18.46 कोटी रुपये मिळणार आहेत. मागच्या पर्वात हीच रक्कम 8,00,000 अमेरिकन डॉलर (6.61 कोटी) होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका अव्वल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने चांगली कामगिरी करत अव्वल स्थान गाठलं आहे. दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली. तर भारताविरूद्धची मालिका जिंकली आणि अव्वल स्थान गाठलं. तर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 ने पराभूत केलं. तर पाकिस्तानच्या 3-0 ने पराभवाची धूळ चारली. तसेच न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी करत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. गुणतालिकेत टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहीला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

दक्षिण अफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन वेरिएन स्टुब्ले.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी , कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...