WTC Fianl 2023 : ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप सामन्याआधी वाईट बातमी!

WTC Final 2023 : येत्या 7 जूनला सामना पार पडणार आहे मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसीने याबाबत माहिती दिली असून  या बातमीने चाहत्यांचाही हिरमोड झालेला आहे.

WTC Fianl 2023 : ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप सामन्याआधी वाईट बातमी!
| Updated on: Jun 04, 2023 | 7:00 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामन्याला काही दिवस बाकी आहेत. दोन्ही संघांनी मजबूत तयारी केली असून विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. येत्या 7 जूनला सामना पार पडणार आहे मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसीने याबाबत माहिती दिली असून  या बातमीने चाहत्यांचाही हिरमोड झालेला आहे.

काय आहे वाईट बातमी?

कांगारूंचा स्टार बॉलर जोश हेजलवूड फायनलमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे जोश हेजलवूडला सा सामन्याला मुकावं लागणार आहे. आयसीसीने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळताना त्याने तीन सामने खेळले होते यामध्ये त्याला तीन बळी मिळवण्यात यश आलं होतं.

जोशने आयपीएल 2023 मध्ये शेवटचा सामना मुंबई इंडिअन्सविरूद्ध  वानखेडे स्टेडियवर खेळला होता. ऑस्ट्रेलियन संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत हेजलवुडचा समावेश होता. त्यामुळे हा स्ट्राईक बॉलरच दुखापतीमुळे बाहेर पडल्याचा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. हेजलवूडच्या जागी मायकेल नेसरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. नेसरने ऑस्ट्रेलियासाठी दोन कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

 

WTC 2023 फायनलसाठी अंतिम स्क्वॉड :

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (C), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (W), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर