WPL 2023, RCBW vs MIW | मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर 4 विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सचा हा वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सहावा विजय ठरला. याआधीच्या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता.

WPL 2023, RCBW vs MIW | मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर 4 विकेट्सने विजय
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 6:51 PM

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स वूमन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईचा हा सलग दुसऱ्या पराभवानंतर पहिला विजय ठरला आहे. आरसीबीने मुंबईला जिंकण्यासाठी 126 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 21 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून अमेलिया केर हीने सर्वाधिक नाबाद 31 रन्सची विजयी खेळी साकारली. ओपनर हॅली मॅथ्यूज हीने 24 धावांची खेळी केली. यास्तिका भाटीया 30 रन्स केल्या. नॅट ब्रंट 13 रन्स करुन आऊट झाली. कॅप्टन हरमनप्रीत कौर 2 धावा करुन मैदानाबाहेर परतली. पूजा वस्त्राकर हीने 19 रन्सचं योगदान दिलं . तर अमेलिया केर आणि अमनज्योत कौर या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. मुंबईचा हा मोसमातील सहावा विजय ठरला आहे.

आरसीबीची बॅटिंग

त्याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. आरसीबीकडून एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी 29 धावा केल्या. कॅप्टन स्मृती मंधाना हीने 24 धावा केल्या. हीदर नाइट आणि कनिका आहुजा या दोघांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. सोफी डिव्हाईन भोपळा न फोडता माघारी गेली. तर उर्वरित चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. मुंबईकडून अमेलिया केर हीने 3 विकेट्स घेतल्या. इस्सी वोंग आणि नॅट सायव्हर-ब्रंट या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या.

मुंबईचा हा या मोसमातील आरसीबीवर मिळवलेला दुसरा विजय ठरला. मुंबईने 9 मार्च रोजी आरसीबीवर 9 विकेट्सने विजय मिळवला होता.

असं आहे समीकरण

मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला जरी असला तरी पहिल्या स्थानावर कोण राहणार हे आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना हा यूपी विरुद्ध दिल्ली यांच्यात होणार आहे. दिल्लीने हा सामना मोठा फरकाने जिंकला, तर दिल्ली थेट फायनलमध्ये पोहचेल. तसेच फायनलमध्ये पोहचण्यासाठी यूपी विरुद्ध आणि मुंबई यांच्यात एलिमिनेटर सामना रंगेल.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना आणि प्रीती बोस.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.