गुजरात जायंट्सने आरसीबीला 6 गडी राखून केलं पराभूत, स्पर्धेतील आव्हान धोक्यात

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने आरसीबीला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह आरसीबीच्या स्पर्धेती आव्हानाला धक्का बसला आहे. तर गुजरात जायंट्स पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतली आहे.

गुजरात जायंट्सने आरसीबीला 6 गडी राखून केलं पराभूत, स्पर्धेतील आव्हान धोक्यात
गुजरात जायंट्स टीम
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 27, 2025 | 10:50 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आव्हानाला धक्का बसला आहे. सलग तीन पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं गुणतालिकेत मोठं नुकसान झालं. गुजरात जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 20 षटकात 7 धक्के देत 125 धावांवर रोखलं. गुजरात जायंट्समोर विजयासाठी 126 धावांचं आव्हान होतं. तसं पाहिलं तर हे आव्हान सोपं होतं. पण गुजरात जायंट्सला सुरुवातीला धक्के बसल्यानंतर काय होतं आणि काय नाही याची चिंता क्रीडाप्रेमींना लागून होती. पण गुजरात जायंट्सची कर्णधार अॅशले गार्डनर हीने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. तिने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. तिला फोबे लिचफिल्डीची उत्तम साथ लाभली. तिने 21 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केली. या भागीदारीमुळे गुजरातने बंगळुरुने दिलेलं आव्हान 16.3 षटकात पूर्ण केलं.

आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, मला वाटत नाही की आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. आमचे प्रयत्न अपुरे पडले आणि परिस्थितीचे मूल्यांकन केले नाही. खेळपट्टी इतर सामन्यांपेक्षा खूप वेगळी होती. हे आम्हाला खरोखरच त्रास देणार आहे. क्रिकेट असे आहे आणि तुम्हाला करावं लागेल. आम्हाला स्वतःला वर काढावे लागेल आणि परत यावे लागेल. आम्ही तिन्ही विभागांमध्ये लक्ष घालू. एक संघ म्हणून, आम्हाला पुढे जावे लागेल. राघवी बिस्ट आणि कनिका आहुजा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. कनिका दुर्दैवाने गेल्या हंगामात हुकली. त्यांच्यासाठी आनंदी आहे. आशा आहे की आम्ही सर्वजण योगदान देऊ.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत, रेणुका सिंग ठाकूर.

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशले गार्डनर (कर्णधार), काशवी गौतम, डिआंड्रा डॉटिन, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली.