
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आमि गुजराज जायंट्स यांच्यात रंगला. तसं पाहिलं तर दोन्ही संघांना या स्पर्धेतील पहिल्या विजयाची चव चाखायची होती. पण नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि गुजरातच्या आशा मावळल्या. मुंबईने प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने गुजरातच्या मनाविरुद्ध निर्णय झाला. सामन्यात झालंही तसंच.. गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमवून 120 धावा केल्या आमि विजयासाठी 121 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान तसं पाहीलं तर सोपं होतं. पण मुंबईला हे आव्हान गाठताना सुरुवातीला काही धक्के बसले. पण नॅट स्कायव्हर ब्रंट एका बाजूने खिंड लढवत राहिली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. नॅट स्कायव्हर ब्रंटने 39 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने हा सामना 5 गडी गमवून 23 चेंडू राखून जिंकला. मुंबईने हे आव्हान 16.1 षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सकडून हेले मॅथ्यूज सर्वात प्रभावी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात 16 धावा देत तीन गडी बाद केले. तर नॅट स्कायव्हर ब्रंट आणि अमेला केर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर शबनिम इस्माईल आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.सामन्यातील विजयानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यक्त झाली. तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की. ‘आमच्या नियोजनानुसार सर्वकाही झाले याचा मला खरोखर आनंद आहे. पहिल्या डावात सहा षटके खूप महत्त्वाची असतात. आम्ही पहिल्या सहा षटकांसाठी योग्य गोलंदाज निवडले. अधिक सातत्य राखायचे आहे. एक उत्तम संघ आणि संतुलित संघ आहे.’
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम, प्रिया मिश्रा.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जी कमलिनी, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया