
वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्यात बंगळुरुची कर्णधार स्मृती मनधाना हीने धमाका केला आहे. बडोदऱ्यातील कोतंबी स्टेडियममध्ये स्मृतीने विजयी धावांचा पाठलाग करताना झंझावाती अर्धशतक झळकावलं आहे. स्मृतीने बंगळुरुला डॅनियल व्याट-हॉज हीच्यासह धमाकेदार सुरुवात करुन दिलीय. स्मृतीने या दरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं आणि बंगळुरुला सलग दुसऱ्या विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलंय.
स्मृतीने नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एकेरी धाव घेत अर्धशतक झळकावलं. स्मृतीने 27 बॉलमध्ये 185.19 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीच्या डब्ल्यूपीएल कारकीर्दीतील तिसरं अर्धशतक ठरलं. स्मृतीने अर्धशतकी खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. अर्थात स्मृतीने 9 बॉलमध्ये 38 धावा केल्या. स्मृतीने अर्धशतकानंतरही फटकेबाजी अशीच सुरु ठेवली. स्मृती आणि डॅनियल व्याट-हॉज या दोघींनी शतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर 7 धावा जोडल्यानंतर बंगळुरुने पहिली विकेट गमावली. बंगळुरुला 107 धावांवर पहिला झटका लागला. डॅनियल व्याट-हॉज 33 बॉलमध्ये 42 रन्स करुन आऊट झाली.
डॅनियल आऊट झाल्यानंतर स्मृतीने तडाखेदार खेळी सुरुच ठेवली. स्मृतीने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. स्मृतीकडे बंगळुरुला विजयी करुन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र तंस होऊ शकलं नाही. स्मृतीने 47 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 81 धावा केल्या. स्मृतीने या खेळीसह या स्पर्धेच्या इतिहासात 500 धावांचा टप्पाही पूर्ण केला.
स्मृतीच्या 500 धावा
Now that’s a milestone to be super proud of. 👏
Smriti Mandhana racks up 500 runs in WPL, a feat that is a burning ode to her brilliance. 🔥 ⚡️#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2025 #DCvRCB pic.twitter.com/ZgdC4TWfeH
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 17, 2025
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मारिजान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कॅप्टन), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे आणि रेणुका ठाकूर सिंग.