
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एकूण 5 संघांमध्ये वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा थरार सुरु आहे. आतापर्यंत या हंगामात एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबई इंडियन्स वूमन्स टीम या हंगामातील दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईने यंदा मोहिमेतील पहिला सामना 15 फेब्रुवारीला दिल्लीविरुद्ध खेळला. थर्ड अंपायरने दिलेले 3 वादग्रस्त निर्णय मुंबईच्या पराभवात निर्णायक ठरले. दिल्लीने मुंबईवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. दिल्लीने मुंबईवर 2 विके्टसने मात केली. त्यामुळे आता पलटणचा दुसऱ्या सामन्यात जिंकून विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबईसमोर दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स वुमन्सचं आव्हान असणार आहे. गुजरातचा हा या हंगामातील तिसरा सामना असणार आहे. गुजरातला पहिल्या सामन्यात बंगळुरुकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर गुजरातने रविवारी 16 फेब्रुवारीला यूपी वॉरियर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. आता गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात मंगळवारी 18 फेब्रुवारीला सामना खेळवण्यात येणार आहे.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना हा कोतंबी स्टेडियम, वडोदरा येथे खेळवण्यात येणार आहे.
गुजरात विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर सामना पाहायला मिळेल.
गुजरात जायंट्स महिला संघ : ॲश्ले गार्डनर (कर्णधार), लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, दयालन हेमलता, सिमरन शेख, मेघना सिंग, सायली सातघरे, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, कश्वी गौतम, मन्नत कश्यप, शबनम एमडी शकील, प्रकाशिका नाईक, भारती फुलमाळी, फोबी लिचफिल्ड आणि डॅनियल गिब्सन.
मुंबई इंडियन्स महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, जिंतिमणी कलिता, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशानान, बाल्केरी, चक्केरी, शबनीम इस्माईल. सिसोदिया, अमनदीप कौर, जी कमलिनी, अक्षिता माहेश्वरी आणि नदीन डी क्लार्क.