AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Narwekar: कुलाबा मतदार संघात उमेदवारांना दमदाटी नि धमक्या, राहुल नार्वेकर अखेर आरोपांवर स्पष्टच बोलले…राऊतांना काय दिला सल्ला?

Rahul Narwekar on Colaba Constituency: कुलाबा मतदारसंघात उमेदवारांना दमदाटी आण धमक्या दिल्याचा आरोप होत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर त्यावर मौन सोडले आहे. त्यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्या आरोपांवर आक्षेप घेत असा टोलाही लगावला.

Rahul Narwekar: कुलाबा मतदार संघात उमेदवारांना दमदाटी नि धमक्या, राहुल नार्वेकर अखेर आरोपांवर स्पष्टच बोलले...राऊतांना काय दिला सल्ला?
राहुल नार्वेकर, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jan 01, 2026 | 1:02 PM
Share

विनायक डावरूंग

Rahul Narwekar on Sanjay Raut: कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधु मकरंद नार्वेकर हे भाजपकडून महापालिका लढवत आहेत. तर नामनिर्देशन अर्ज भरताना कुलाब्यात विरोधी उमेदवारांना दमदाटी आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर राहुल नार्वेकर यांनी अखेर मौन सोडले. त्यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कुलाबा मतदार संघात कुठलाही वाद अथवा बंडखोरी नसल्याचा दावाही नार्वेकर यांनी केला.

कुलाब्यात आता कोणतीही बंडखोरी नाही

कुलाबा विधानसभेत एकूण ६ जागा आहेत.तितके कार्यकर्ते नाराज होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आता कोणतीही बंडखोरी नाही आहे. काहींनी अर्ज मागे घेतले आहे. भाजपअंतर्गत कोणतीही नाराजी नाही असे राहुल नार्वेकर यांन स्पष्ट केले. तर कुलाबा महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांना धमकावल्याचे आरोप त्यांनी फेटाळले.

संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल

कुलाबा प्रकरणात संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नार्वेकरांवर गंभीर आरोप केले. त्यांनी विरोधकांना धमकावल्याचे राऊतांचे म्हणणे होते. त्यावर आता नार्वेकरांनी उत्तर दिले आहे. राऊतांकडून हीच अपेक्षा होती.पराजय होत असताना बिनबुडाचे आरोप ते करत आहेत. वारंवार सांगण्यात येत आहे की धमक्या दिल्या, नामांकन दाखल होऊ दिले नाही. ५ वाजता सगळे आत होते त्यांना घेतलं गेलं २१२ वॉर्डच्या आमच्या उमेदवार होत्या त्यांना अर्ज भरता आला नाही.रडीचा डाव त्यांच्याकडून होतो आहे मी काय आमच्याच भाजपचा अर्ज थांबवू शकतो का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

उबाठाने दुपारी १ वाजता एबी फॉर्म दिले.वेळेत अर्ज दिले असते तर त्यांच्या उमेदवारांना अर्ज भरता आले असते.मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून भूमिका निभावतो तेव्हा निष्पक्ष काम करत असतो.माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून काम करत असतो.राऊत यांनी पहिले माहिती घ्यावी आणि मग बोलावं. मी काय काम करावं आणि काय नाही हा सल्ला देणयाची गरज नाही असा टोलाही नार्वेकर यांनी राऊतांना लगावला.

मैत्रिपूर्ण लढत होणार

हर्षिता नार्वेकर यांनी वॉर्ड क्रमांक २२५ मधून अर्ज भरला आहे, भाजपसोबत मैत्रिपूर्ण लढत झाली तरी आम्ही ती जागा १२ हजारांच्या मताधिक्याने जिंकून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मकरंद नार्वेकर यांनी चांगले काम केले आहे त्यामुळे जनमत त्यांच्या सोबत आहे. विरोधकांकडे अर्धवट माहिती आहे. हर्षिता आणि मकरंद मी भाजपात येण्याआधीपासून भाजपचे सदस्य आणि नगरसेवक आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्यांना संघटनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे, असा दावा त्यांनी घराणेशाहीच्या आरोपांवर केला आहे.

शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी.
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज.
महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 नगरसेवक दणक्यात बिनविरोध विजयी
महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 नगरसेवक दणक्यात बिनविरोध विजयी.
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?.
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?.
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले.
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.