Sonali Bendre : सोनालीवर जीवापाड प्रेम करायचा लोकप्रिय क्रिकेटर… अपहरणाची धमकी अन्… म्हणालेला…
Sonali Bendre : सोनाली बेंद्रेच्या सौंदर्यावर फिदा झालेला पाकिस्तानी किक्रेकट, थेट दिलेली अपहरणाची धमकी... त्यानंतर म्हणालेला..., अनेकांनी नाही माहिती किस्सा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिची चर्चा...

Sonali Bendre : बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज सोनाली मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आज सोनाली हिला वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे. अनेक सेलिब्रिटी देखील सोनालीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. महत्त्वाचं म्हणजे एक पाकिस्तानी क्रिकेटर देखील अभिनेत्रीच्या प्रेमात होता. ज्याने सोनाली हिला थेट अपहरणाची धमकी दिलेली… अशा देखील चर्चा रंगल्या… यावर खुद्द न शोएब अख्तर याने स्पष्टीकरण देखील दिलं होतं.
रिपोर्टनुसार, शोएब अख्तरला सोनाली बेंद्रे प्रचंड आवडत होती. अभिनेत्रीबद्दल एका मुलाखतीत शोएब अख्तर म्हणाला. सोनाली प्रपोज करण्यासाठी काहीही करेल आणि जर तिने माझं प्रेम मान्य केलं नाही तर, मी तिचं अपहरण करेल.. असं शोएब अख्तर एका टॉक शोमध्ये म्हणाला होता. एवढंच नाही तर, सोनालीचा फोटो क्रिकेटर पर्समध्ये ठेवत असल्याचं देखील अनेकदा समोर आलं.
शोएब अख्तर म्हणालेला, ‘मी सोनाली हिचे जवळपास 2 वेळा सिनेमे पाहिले असतील… मी सोनाली हिचा कधीच चाहता देखील नव्हतो… मी तिला कधी भेटलो देखील नाही… फक्त सिनेमांमध्ये तिला पाहिलं आहे… ती खूप सुंदर दिसते… कर्करोगाला झुंज देत असताना मी तिचा संघर्ष पाहिला आहे. तिने मोठा संघर्ष करुन गंभीर आजाराला हरवलं आहे.. तिचा संघर्ष पाहिल्यानंतर मात्र मी तिचा चाहता झालो… तिने इतर महिलांना मार्ग दाखवला. माझा तिच्यासोबत कधीच संबंध नव्हते.’ असं देखील शोएब अख्तर म्हणाला.
सोनाली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये करियर करत असताना तिचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. अनेक अभिनेत्यांनी तिच्याबद्दल असलेल्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत सोनाली हिने संसार थाटला नाही. अखेर सोनाली हिने खास मित्र गोल्डी बहल याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. अभिनेत्री कायम पती आणि मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
