AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : संजूची मॅचविनंग खेळी, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, विंडीजचा 5 विकेट्सने धुव्वा

India vs West Indies Super 8 Match Result : वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान संजूच्या खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं आणि विजय मिळवला.

IND vs WI : संजूची मॅचविनंग खेळी, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, विंडीजचा 5 विकेट्सने धुव्वा
Sanju Samson Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 01, 2026 | 11:10 PM
Share

ओपनर संजू सॅमसन याने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियासमोर या स्पर्धेत सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचं आव्हान होतं. वेस्ट इंडिजने भारतासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये हे आव्हान 4 बॉलआधी आणि 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद आणि धमाकेदार खेळीच्या जोरावर हे आव्हान पूर्ण केलं. भारताने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. टीम इंडियाचा हा सुपर 8 मधील दुसरा तर साखळी फेरीसह एकूण सहावा विजय ठरला. इंडिया यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली.  तर पराभवासह वेस्ट इंडिजचं स्पर्धेतून पॅकअप झालं आहे.

सामन्यात काय झालं?

टीम इंडियाने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विंडीजला झटका दिले. मात्र जेसन होल्डर आणि रोव्हमॅन पॉवेल या जोडीने विंडीजसाठी निर्णायक सामन्यात मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात निर्णायक योगदान दिलं. जेसन होल्डर आणि रोव्हमॅन पॉवेल या जोडीने पाचव्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये नॉट आऊट 76 रन्सची पार्टनरशीप केली. विंडीजने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 रन्स केल्या. रोवमॅन 34 आणि जेसनने 37 रन्स केल्या. तर टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

त्यानंतर संजूने केलेल्या चाबूक खेळीमुळे भारताने हा सामना कोणत्याही अडचणींशिवाय जिंकला. संजूने नॉट आऊट 97 रन्स खेळी केली.   संजू व्यतिरिक्त या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. मात्र संजू टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.

टीम इंडियाची बॅटिंग

अभिषेक शर्मा आणि इशान किशन या दोघांनी प्रत्येकी 10 धावा जोडल्या. सूर्याने 18 आणि तर हार्दिकने 17 धावा केल्या. तिलक वर्मा याने संजूला साथ देत निर्णायक 27 धावांची खेळी साकारली. तर शिवम दुबे याने अखेरच्या क्षणी 2 चौकार लगावून नाबाद 8 धावा केल्या आणि संजूसह नाबाद परतला. संजूने 50 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 12 फोरसह नॉट आऊट 97 रन्स केल्या. तर विंडीजसाठी जेसन होल्डर आणि शामर जोसेफ या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिलवल्या. तर अकील होसेन याने 1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार