MIW vs RCBW : आरसीबीने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी ठेवलं 200 धावंचं आव्हान, कोण मारणार बाजी?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 20वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा आहे.

MIW vs RCBW : आरसीबीने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी ठेवलं 200 धावंचं आव्हान, कोण मारणार बाजी?
वुमन्स प्रीमियर लीग
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 11, 2025 | 9:28 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकणं खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकला तर मुंबई इंडियन्स थेट अंतिम फेरी गाठेल. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्नात असेल. मुंबईने हा सामना गमावला तर दिल्ली कॅपिटल्सला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. दुसरीकडे मुंबई इंडियन्सला अंतिम फेरी गाठण्यासाठी गुजरात जायंट्सशी सामना करावा लागेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकरून स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली. तिने 37 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 53 धाव केल्या. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडून हिली मॅथ्यूजन 2 आणि अमेलिया केरने 1 विकेट घेतला. या व्यतिरिक्त एकही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 200 धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करावी लागणार यात शंका नाही. जर मुंबई इंडियन्सने हा सामना गमवला तर दिल्ली कॅपिटल्सचं अंतिम फेरी गाठण्याचं हे तिसरं वर्ष असेल. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सने पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुने जेतेपद पटकावलं होतं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सभिनेनी मेघना, स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, हेदर ग्रॅहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्ही.जे.