
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामात (WPL 2025) साखळी फेरीतील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील आठवा आणि अंतिम सामना आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर स्मृती मानधनाकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? सामना कुठे पाहता येणार? हे सर्वकाही जाणून घेऊयात.
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना मंगळवारी 11 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
पलटण सामन्यासाठी सज्ज, मुंबईत बंगळुरुविरुद्ध भिडणार
Matchday 2 in Mumbai 💙#AaliRe #MumbaiIndians #TATAWPL #MIvRCB pic.twitter.com/5iQrx6b5C2
— Mumbai Indians (@mipaltan) March 11, 2025
मुंबई इंडियन्स वूमन्स टीम : हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, जिंतीमणी कलिता, अमनदीप कौर आणि अक्षिता माहेश्वरी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वूमन्स टीम : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, शार्लोट डीन, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिश्त, डॅनिएल व्याट-हॉज, नुजहत परवीन, हेदर ग्रॅहम, जाग्रवी पवार, प्रेमा रावत आणि जोशीथा व्ही.जे.