WPL 2025 : आरसीबीचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय, कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं कसं काय झालं ते..

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. या सामन्यात आरसीबीचा संघ दिल्लीवर भारी पडला. कर्णधार स्मृती मंधाना हीने 81 धावांची खेळी करत संघाला विजयश्री मिळवून दिला. या विजयानंतर तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

WPL 2025 : आरसीबीचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय, कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं कसं काय झालं ते..
| Updated on: Feb 17, 2025 | 11:03 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरु आहे. मागच्या पर्वात जेतेपद मिळवल्यानंतर विजयाची लय कायम ठेवली आहे. पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सला 8 गडी राखून मात दिली आहे. यासह गुणतालिकेत आरसीबीने अव्वल स्थान पटकावलं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने आतापर्यंत स्पर्धेत चालत आलेल्या ट्रेंड प्रमाणे प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कारण रात्री मैदानात दव पडलं की गोलंदाजी करणं कठीण जातं. त्याचा फायदा फलंदाजांना होतो. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्व गडी गमवून 141 धावा केल्या आणि विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. स्मृती मंधानाने या सामन्यात चांगली खेळी केली. तिने 47 चेंडूत 10 चौकार आमइ 3 षटकारांच्या मदतीने 81 दावा केल्या. या विजयासह आरसीबीच्या खात्यात आणखी दोन गुण गेले आहेत. तसेच नेट रनरेटही चांगलाच वधारला आहे. या विजयानंतर स्मृती मंधानाने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

स्मृती मंधानाने सांगितलं की, ‘गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. त्यांना 150 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवणे ही एक उत्तम गोष्ट होती. व्यॅट फलंदाजीत हुशार आहे. अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची रणनीती होती. हे मैदान कधीही दोन्ही वेळेस सारखं नसतं. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली ती उत्तम होती. एक संघ म्हणून आम्हाला आमच्या गोलंदाजांचा अभिमान आहे. एकता पहिल्याच षटकात हिट झाली पण ती खरोखरच चांगली परतली. मी आणि डॅनी यांनी एकत्र अनेक वेळा फलंदाजी केली आहे. गेल्या सामन्यात आम्हाला चांगली सुरुवात करता आली नाही म्हणून आम्ही निराश झालो होतो. आम्ही आज खेळत राहिलो आणि आज फटकेही निघाले’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मारिजाने कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग