
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून धावा केल्या आणि विजयासाठी धावांचं आव्हान दिलं. आरसीबीकडून स्मृती मंधाना आणि डॅनियल व्यॅट ही जोडी मैदानात उतरली होती. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 29 धावांची भागीदारी केली. यात 13 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने स्मृती मंधाना 26 धावा करून बाद झाली. त्यानंतर डॅनियल 9 धावांवर तंबूत परतली. एलिसा पेरीने एका बाजूने खिंड लढवत होती. तर दुसऱ्या बाजूने विकेट पडत होता. कनिका अहुजा 3, तर राघवी बिश्त 1 धाव करून बाद झाली. त्यानंतर रिचाने एलिसा पेरीसोबत चांगली भागीदारी केली. पण 28 धावांवर असताना अमनजोत कौरने तिचा त्रिफळा उडवला. जॉर्जिया वारेहमही काही खास करू शकली नाही. 6 धावांवर असताना बाद झाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून एलिसा पेरीने सर्वाधिक धावा केल्या. तिने 43 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सने सहा गोलंदाज काढले. यात अमनजोत कौरने 3 गडी बाद केले. तर शबनिम इस्माईल, नॅट स्कायव्हर ब्रंट, हिली मॅथ्यूज, संस्कृती गुप्ता यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका सिंग ठाकूर.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया