
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला (IPL 2025) शनिवार 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामाचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत 6 मार्चपर्यंत एकूण 5 संघांमध्ये 16 सामने खेळवण्यात आले आहेत. आता हा डब्ल्यूपीएलचा तिसरा हंगाम रंगतदार स्थितीत पोहचला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. दिल्ली या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. तर मुंबई विरुद्ध यूपी सामन्यानंतर एका संघांचं या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्ठात आलं आहे.
डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामातील 16 व्या सामन्यात गुरुवारी 6 मार्चला मुंबई विरुद्ध यूपी आमनेसामने होते. मुंबईने ह सामना 6 विकेट्स जिंकला. यूपीने मुंबईला विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. मुंबईचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला.
पलटणने या चौथ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावरुन दुसर्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईने या विजयासह आता प्लेऑफसाठीचा दावा मजबूत केला आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +0.267 असा आहे. त्यामुळे मुंबईने आता पुढील सामना जिंकल्यास ते प्लेऑफमधील पोहचतील. तसेच या एका जागेसाठी मुंबईसह गुजरात आणि बंगळुरु यांच्यातही चुरस पाहायला मिळणार आहे. तर तर दुसऱ्या बाजूला यूपीचा या पराभवासह स्पर्धेतून जवळपास बाजार उठला आहे.
युपीचा मुंबईविरुद्धचा हा या हंगामातील सातवा सामना होता. यूपीने यंदा या 7 पैकी 5 सामने गमावले आहेत. तर केवळ 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर युपीचा या स्पर्धेतील शेवटचा सामना हा 8 मार्च रोजी आरसीबीविरुद्ध होणार आहे. त्यामुळे यूपीने हा सामना जिंकला तरी त्यांचे 6 गुण होतील. मात्र त्यानंतरही ते प्लेऑफसाठी पात्र ठरु शकणार नाहीत.
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.