WPL 2025 : मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, पलटणची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उडी
Womens Premier League 2025 Points Table Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने लखनऊमध्ये यूपी वॉरियर्जवर विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामातील (Wpl 2025) 16 व्या सामन्यात यूपी वॉरियर्सवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. गुरुवारी 6 मार्चला लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. यूपी वॉरियर्जने मुंबईला विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 9 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 18.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 153 धावा केल्या.
मुंबईसाठी ओपनर हॅली मॅथ्यूज हीने सर्वाधिक 68 धावांचं योगदान दिलं. नॅट सायव्हर-ब्रंटने 37 धावा केल्या. तसेच इतरांनीही विजयात योगदान दिलं. मुंबईचा हा या स्पर्धेतील चौथा विजय ठरला. मुंबईने यासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.
मुंबई दुसऱ्या स्थानी
मुंबई यूपीविरुद्धच्या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये 3 विजयांसह तिसऱ्या स्थानी होती. मात्र चौथा विजय मिळवताच मुंबई एका स्थानाची उडी घेतली आणि दुसऱ्या स्थानी पोहचली. मुंबईच्या खात्यात आता 6 सामन्यांनंतर 8 गुण झाले आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा +0.267 असा आहे. मुंबईच्या या विजयानंतर प्लेऑफच्या आशा वाढल्या आहेत. तर दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. दिल्लीने 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीच्या खात्यात 10 गुण असून त्यांचा नेट रनरेट हा +0.482 असा आहे.
आता 10 मार्चला सामना
दरम्यान मुंबई वूमन्स प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेतील आपला सातवा सामना हा 10 मार्च रोजी गुजरात जायंट्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबईचा हा सामना जिंकून प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
Mumbai Indians jump to second spot in the WPL 2025 Points Table after their win against UP Warriorz. 🏆⚡#Cricket #WPL #UPWvMI #Sportskeeda pic.twitter.com/Q01mA6D0sU
— Sportskeeda (@Sportskeeda) March 6, 2025
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.
