
डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात थेट अंतिम फेरीत धडक दिलीय. तर उपांत्य फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? हे मंगळवारी 3 फेब्रुवारीला ठरणार आहे. अंतिम फेरीतील दुसरा संघ कोण असणार? हे एलिमिनिटेर सामन्यातून निश्चित होणार आहे. एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहचेल. दिल्ली याआधी सलग आणि एकूण 3 वेळा अंतिम फेरीत पोहचली आहे. त्यामुळे दिल्ली गुजरातला लोळवत सलग चौथ्यांदा अंतिम फेरीचं तिकीट मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उभयसंघात होणारा एलिमिनेटर सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना मंगळवारी 3 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना बडोद्यातील कोतांबी येथील बीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.
दरम्यान एलिमिनेटरच्या निमित्ताने गुजरात-दिल्ली या दोन्ही संघांची चौथ्या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. गुजरातने याआधी दोन्ही सामन्यात दिल्लीवर निसटता विजय मिळवला आहे. गुजरातने दिल्लीवर 11 जानेवारीला फक्त 4 धावांनी मात केली होती. त्यानंतर गुजरातने 27 जानेवारीला दिल्लीवर 3 धावांनी विजय मिळवला होता. अशात आता दिल्ली एलिमिनेटरमध्ये विजय मिळवून गुजरात जायंट्स विरुद्ध गेल्या 2 पराभवांची परतफेड करत हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.