
Anushka Sharma In WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर आता पुढे जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात पार पडला. हा सामना गुजरात जायंट्सने 10 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. बेथ मूनी आणि सोफी डिवाइन यांनी चांगली आणि आक्रमक फलंदाजी केली. ही जोडी फुटल्यानंतर अनुष्का शर्मा मैदानात उतरली. तिने आक्रमक लय कायम ठेवली आणि पदार्पणाच्या सामन्यात फटकेबाजी सुरू केली. अनुष्का शर्माने 30 चेंडूंचा सामना केला आणि 44 धावा ठोकल्या. यावेळी तिने 146.66 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या खेळीत एकूण 7 चौकार मारले. तिने तिसर्या विकेटसाठी एश गार्डनरसह 103 धावांची भागीदारी केली.
22 वर्षीय अनुष्का शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाकडून खेळते. अष्टपैलू खेळाडू असून अंडर 19 क्रिकेटमध्ये तिने नावलौकिक मिळवला होता. फलंदाज अनुष्का शर्मा मधल्या फळीत फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी देखील करते.त्यामुळे अनुष्का शर्माला घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर गुजरात जायंट्सने मोठी बोली लावली आणि अनुष्काला संघात घेतलं. अनुष्का शर्मासाठी गुजरात जायंट्सने 45 लाखांची बोली लावली. बेस प्राईसच्या 4.5 पट जास्त पैसे मिळाले. लिलावात सर्वाधिक बोली लागलेली अनकॅप्ड खेळाडू ठरली. आता अनुष्का शर्मा आपल्या आक्रमक खेळीने हा निर्णय योग्यच होता हे दाखवून दिलं आहे. अनुष्का शर्माच्या खेळीमुळे संघाला 207 धावांपर्यंत मजल मारता आली.
Classical stuff! 😍
Gujarat Giants’ young batter Anushka Sharma is showcasing her talent with fluent strokeplay on debut! 👏🏻#TATAWPL, #GGvUPW 👉 LIVE NOW ➡️ https://t.co/wB52zoL2TW pic.twitter.com/W9MY1SrWVp
— Star Sports (@StarSportsIndia) January 10, 2026
अनुष्का शर्मा या पर्वात वरिष्ठ महिला संघाकडून टी20 स्पर्धेत खेळली. यावेळी तिने 207 धावा केल्या होत्या. आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. अनुष्का शर्माने वरिष्ठ महिला इंटरझोनल ट्रॉफीत सेंट्रल झोनसाठी चांगली कामगिरी केली होती. त्यात त्याने 125च्या स्ट्राईक रेटने 155 धावा केल्या होत्या. तसेच 7 विकेट घेतल्या होत्या.