WPL 2026: RCB ने फक्त चार खेळाडूंना ठेवलं कायम, लिलावात बांधणार नवा संघ

वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धा संपल्यानंतर आता वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेसाठी मेगा लिलाव होणार आहे. तत्पूर्वी फ्रेंचायझींना जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन ठेवण्याची परवानगी आहे. तर इतर खेळाडूंना रिलीज करावं लागणार आहे. त्यानुसार आरसीबीने फक्त चार खेळाडूंना रिटेन केलं आहे.

WPL 2026: RCB ने फक्त चार खेळाडूंना ठेवलं कायम, लिलावात बांधणार नवा संघ
WPL 2026: RCB ने फक्त चार खेळाडूंना ठेवलं कायम, लिलावात बांधणार नवा संघ
Image Credit source: RCB Twitter
| Updated on: Nov 06, 2025 | 8:14 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 जोरदार तयारी सुरु झाली आहे. भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर या स्पर्धेचं महत्त्व आणखी वाढलं आहे. यंदाचं वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं चौथं पर्व आहे. त्यामुळे मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघानेही नव्या पर्वासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मेगा लिलावापूर्वी प्रत्येक संघाला फक्त पाच खेळाडू रिटेन करण्याची मुभा आहे. या पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. यात कर्णधार स्मृती मंधानासह तीन स्टार खेळाडूंना रिटेन केलं आहे. आरसीबीने पुढच्या पर्वासाठी एलिसा पेली, ऋचा घोष आणि श्रेयंका पाटील यांना रिटेन केलं आहे. या खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीने 2024 स्पर्धेचा किताब जिंकला होता.

वुमन्स प्रीमियर लीगच्या रिटेन्शन नियमांनुसार, जर एखाद्या फ्रँचायझीला जास्तीत जास्त पाच खेळाडूंना कायम ठेवायचे असेल तर त्यापैकी एक अनकॅप्ड खेळाडू असणे आवश्यक आहे. आरबीसीने चार खेळाडू रिटेन केलं आहेत. त्यापैकी तीन खेळाडूंसाठी कोट्यवधि रुपये मोजले आहेत. स्मृती मंधानाला 3.5 कोटी, ऋचा घोषला 2.75 कोटी आणि एलिसा पेरीला 1 कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे. तर श्रेयंका पाटीलला 60 रुपये दिले आहेत. या शिवाय इतर 14 खेळाडूंना रिलीज केलं आहे. आरसीबी फ्रँचायझीला एका खेळाडूवर आरटीएम कार्ड वापरण्याची परवानगी आहे. आता आरसीबीला मेगा लिलावात कोणत्या खेळाडूंसाठी बोली लावावी लागणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आरसीबीने या खेळाडूंना केलं रिलीज

आरसीबीने डॅनी व्याट हॉज, सब्बीनेनी मेघना, सोफी डिवाइन, राघवी बिस्ट, जोशीता वीजे, आशा शोभना, चार्ली डीन, जॉर्जिया वेयरहैम, कनिका आहूजा, प्रेमा रावत, रेणुका सिंह, केट क्रॉस, एकता बिष्ट, जाग्रवी पवार या खेळाडूंना रिलीज केलं आहे. प्रत्येक फ्रँचायझीकडे आगामी पर्वासाठी त्यांच्या संघाची पुनर्बांधणी करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी असेल. आरसीबीने 6.85 कोटी रिटेन्शनमध्ये खर्च केले आहेत. त्यामुळे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 8 कोटी 15 लाख रुपये आहेत.