
डब्ल्यूपीएलच्या आगामी चौथ्या मोसमासाठी (WPL 2026) मेगा ऑक्शन संपन्न झालं आहे. या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 277 खेळाडू सहभागी झाले होते.त्यापैकी एकूण फ्रँचायजींना जास्तीत जास्त 73 खेळाडूंची गरज होती. मात्र एकूण 5 फ्रँचायजींनी गरजेनुसार 67 खेळाडूंचीच ऑक्शनद्वारे निवड केली. या 67 खेळाडूंमध्ये 23 विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. एकूण 5 फ्रँचायजींनी 67 खेळाडूंसाठी 40.8 कोटी रुपये खर्च केले. टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूला यूपीने आरटीएमद्वारे 3 कोटी 20 लाख रुपयात आपल्या गोटात घेतलं.
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी चौथ्या मोसमासाठीच्या मेगा ऑक्शनचा थरार तब्बल साडे 5 तास रंगला. मेगा ऑक्शनला दुपारी साडे 3 वाजता सुरुवात झाली. तर जवळपास रात्री 9 वाजता या मेगा ऑक्शनची सांगता झाली. एकूण 5 फ्रँचायजींनी 67 खेळाडूंचीच ऑक्शनद्वारे निवड केली. फ्रँचायजींनी या 67 खेळाडूंसाठी 40.8 कोटी रुपये खर्च केले. दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी (3 कोटी 20 लाख) ठरली.
अनसोल्ड खेळाडू : एस मेघना, खुशी भाटिया, प्रणवी चंद्रा, शबनम शकील आणि सहाना पवार.
झटपट ऑक्शमधील अनसोल्ड खेळाडू : सहाना पवार, शानू सेन, एलिसा कॅप्सी, सायमा ठाकोर, अश्विनी कुमार, वैश्विवी शर्मा, गार्गी वानकर, सयाली सातघरे, इजाबेल वोंग, प्रगती सिंह आणि आयुषी शुक्ला.
अनसोल्ड खेळाडू : हीदर नाइट, राजेश्वरी गायकवाड, प्रतिका रावल, नजमा खान, सहाना पवार, शानू सेन,एलिसा कॅप्सी, सायमा ठाकोर आणि अश्विनी कुमार.
अनसोल्ड खेळाडू : एस मेघना, एमी जोन्स, डार्सी ब्राउन, अलाना किंग, वृंदा दिनेश, हुमायर काजी, जिंतिमनी कलिता आणि मिली एलिंगवर्थ.
वूमन्स टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणऱ्या प्रतिका रावल हीला मोठा झटका लागला आहे. प्रतिका रावल वूमन्स प्रीमियर लीग 2026 साठी अनसोल्ड ठरली आहे. प्रतिकाला कोणत्याच संघाने घेतलं नाही.
पूनम खेमनर,तीर्था सतीश,कोमल जनजद, सहाना पवार, कॉटिनी वेब, तारा नॉरिस, शिवाली शिंदे, हीदर ग्राहम, तेजल हसबनीस आणि रबिया खान.
नुजहत परवीन, मरुफा अख्तर, लिया ताहुहू, ईडन कार्सन, राजेश्वरी गायकवाड, फ्रॅन्स जोन्स, सुची उपाध्याय, सलोनी डंगोर आणि लॉरा हॅरीस.
भारती रावल, प्रकाशिका नायक, प्रियांका कौशल, परुणिका सिसोदिया आणि जागर्वी पवार हे 5 अनकॅप्ड फिरकी गोलंदाज पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरल्या.
हॅपी कुमारी, कोमलप्रीत कौर, शबमन शकील आणि मिली एलिंगवर्थ या चौघींची बेस प्राईज प्रत्येकी 10 लाख रुपये इतकी होती. मात्र या चौघी पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरल्या. तसेच 20 लाख रुपये बेस प्राईज असलेली नंदीन शर्मा ही देखील पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलीय.
शिप्रा गिरी, ममता मदिवाला, खुशी भाटिया, प्रत्युषा कुमार आणि नंदीन कश्यप हे 5 अनकॅप्ड विकेटकीपर पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरले. या 5 खेळाडूंची बेस प्राईज प्रत्येकी 10 लाख रुपये इतकी आहे.
अमनदीप कौर (20 लाख), जी तृषा (10 लाख), जी कलिता (10 लाख), यशस्री एस (10 लाख) आणि हुमायरा काजी (10 लाख) हे 5 खेळाडू पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरले.
मुंबई इंडियन्सने संस्कृती गुप्ता हीला 20 लाख या बेस प्राईजमध्ये घेतलं. तर गुजरात जायंट्सने प्रेमा रावत हीला 10 लाख या बेस प्राईजमध्ये घेतलं. मात्र आरसीबीने आरटीम कार्ड वापरलं. गुजरातने आरसीबीसमोर 20 लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला. आरसीबीने हा प्रस्ताव स्वीकारला.
अपवाद वगळता फ्रँचायजींनी अनकॅप्ड फलंदाजांकडे पाठ फिरवली आहे. प्रणवी चंद्रा, वृंदा दिनेश, दीशा कसट आणि आरुषी गोयल या चौघींची बेस प्राईज 10 लाख रुपये इतकी होती. मात्र या चौघी अनसोल्ड ठरल्या. तसेच देवीना पेरीन (20 लाख) ही देखील अनसोल्ड ठरली.
दिल्ली कॅपिट्ल्सने दीया यादव हीला 10 लाख रुपये या बेस प्राईजमध्ये घेतलं. तर सानिका चाळके (10 लाख) पहिल्या फेरीत असोल्ड ठरली.
गायमुख घाटावर घोडबंदर वाहिनीवर दुपारी दोनच्या सुमारास एक मल्टी एक्सेल कंटेनर बंद पडल्यामुळे तो बाजूला करण्याचा प्रयत्न चालू असताना क्रेनसह कंटेनर देखील उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकांला किरकोळ दुखापत झाली आहे.वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम वाहतूक विभाग करत आहे.
जालना : आज महाराष्टात लाडक्या बहिणींची वेगळी ताकद निर्माण झाली.या लाडक्या बहिणींनी क्रांती करून दाखवली आहे. महाविकास आघाडीला लोकसभेत 31 जागा आल्या त्यामुळे मविआने विधानसभे अगोदरच मंत्रिमंडळ जाहीर करून टाकले होते.मात्र लाडक्या बहिणीने ते एन्ट्री मारून मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकले असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लागवला आहे.
लॉरा वॉल्डवॉर्ट हीला कोटीच्या घरात भाव मिळाला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने लॉरा वॉल्डवॉर्ट हीला 1 कोटी 10 लाख रुपयांत आपल्या गोटात घेतलं आहे.
यूपी वॉरियर्सने मेग लॅनिंग हीला आपल्या टीममध्ये घेतले आहे. मेगसाठी यूपी वॉरियर्सने 1 कोटी 90 लाख रुपयांची बोली लावली.
सोफी एक्लेस्टन हीची 50 लाख रुपये बेस प्राईज होती. मात्र यूपी वॉरियर्सने सोफी एक्लेस्टन हीला आरटीएमद्वारे 85 लाख रुपयांत आपल्या गोटात घेतलं आहे. दिल्लीने यूपाीसमोर 85 लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता.
अमेलिया केर हीला मेगा ऑक्शनमध्ये कोटींचा भाव मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने अमेलिया केर हीच्यासाठी कोटींची बोली लावली. मुंबईने अमेलियासाठी 3 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या गोटात घेतलं.
रेणूका सिंह हीला गुजरात जायंट्सने घेतलं आहे. रेणूकाला बेस प्राईजपेक्षा 20 लाख रुपये जास्त मिळाले आहेत. गुजरात जायंट्सने रेणूकासाठी 60 लाख रुपयांची बोली लावली आणि तिला आपल्या गोटात घेतलं.
युपी वॉरियर्सजने दीप्ती शर्माला आरटीएमद्वारे आपल्या गोटात घेतलं आहे. दीप्तीची बेस प्राईज ही 50 लाख होती. मात्र दीप्तीसाठी बेस प्राईजपेक्षा कित्येक पटीने मोठी बोली लावण्यात आली. दीप्तीला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी दिल्ली कॅपिट्ल्स इच्छूक होती. मात्र युपी वॉरियर्जनने दीप्तीसाठी 3 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावली आणि तिला घेतलं.
न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सोफी डीव्हाईनला 2 कोटी रुपयांचा भाव मिळाला आहे. सोफीची बेस प्राईज ही 50 लाख रुपये होती. सोफीला गुजरात जायंट्सने आपल्या गोटात घेतलं.
मेगा ऑक्शला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हीली ही अनसोल्ड राहिली. एलिसा हीलीची बेस प्राईज ही 50 लाख रुपये होती. मात्र 5 पैकी कोणत्याही फ्रँचायजीने एलिसाला आपल्या गोटता घेण्यासाठी रस दाखवला नाही.
डब्ल्यूपीएलच्या आगामी चौथ्या मोसमासाठी एकूण 5 संघांनी आपल्या गरजेनुसार एकूण 16 खेळाडूंना आपल्यासह कायम ठेवलं आहे. कोणत्या संघाने किती खेळाडू कायम ठेवलेत? हे जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स : नॅट सायव्हर-ब्रंट (3.5 कोटी), हरमनप्रीत कौर (2.5 कोटी), हॅली मॅथ्यूज (1.75 कोटी), अमनजोत कौर (1 कोटी) आणि जी कमलिनी (50 लाख)
आरसीबी: स्मृति मानधाना ( 3.5 कोटी), ऋचा घोष (2.75 कोटी), एलिसा पेरी (2 कोटी) आणि श्रेयांका पाटील (60 लाख)
दिल्ली कॅपिटल्स: जेमिमाह रॉड्रिग्स (2.2 कोटी), शफाली वर्मा (2.2 कोटी), अनाबेल सदरलँड (2.2 कोटी), मारिजान काप (2.2 कोटी), निकी प्रसाद (50 लाख)
गुजरात जायंट्स: एश्ले गार्डनर (3.5 कोटी) आणि बेथ मूनी (2.5 कोटी)
यूपी वॉरियर्स: श्वेता सेहरावत (50 लाख)
मेगा ऑक्शनसाठी एकूण 277 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. या 277 पैकी 196 खेळाडू हे भारतीय आहेत. तर 66 विदेशी खेळाडू आहेत. या मेगा ऑक्शनमधून फक्त 77 खेळाडूंचीच निवड केली जाणार आहे. तर इतरांच्या पदरी निराशा येणार आहे.