AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2023 Final | झालं आत्ता पलटण जिंकणारच! 5 वेळ आयपीएल चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा याचा ‘पलटण’ला सल्ला, म्हणाला…

पहिल्या पर्वतील फायनल जिंकत इतिहास रचण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद लावतील. या सामन्याआधी पुरूष मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने महिला संघाला एक खास मेसेज दिला आहे.

WPL 2023 Final | झालं आत्ता पलटण जिंकणारच! 5 वेळ आयपीएल चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा याचा 'पलटण'ला सल्ला, म्हणाला...
| Updated on: Mar 26, 2023 | 6:15 PM
Share

मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगच्या पहिल्या पर्वातील अंतिम सामना मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये होणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना असून फायनल जिंकत इतिहास रचण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद लावतील. या सामन्याआधी पुरूष मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने महिला संघाला एक खास मेसेज दिला आहे.

गेल्या चार आठवड्यांमध्ये तुम्ही सर्व ज्या प्रकारे खेळला ते पाहून आनंद झाला. आजचा सामन्यासारखा सामना हा तुम्हाला रोज खेळण्याची संधी मिळणार नाही. फायनलचा आनंद घ्या आणि सामन्यामध्ये तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आम्हालाही तुम्हाला मैदानावर पाहून आनंद होणार असल्याचं रोहित शर्मा याने सांगितलं.

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजेपासून विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या फायनलमध्ये उतरण्यापूर्वी ‘हिटमॅन’ रोहित शर्माने त्याला प्रोत्साहन देताना एक खास संदेश शेअर केला आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील MI पुरुष संघ इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे, ज्याने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत.

मुंबई पलटनच्या सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड या खेळाडूंनी महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या मुली पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. एक कुटुंब म्हणून मी तुम्हाला WPL फायनलसाठी शुभेच्छा, असं सूर्या म्हणाला.

मुंबईच नेतृत्व भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे तर दिल्लीच नेतृत्व मेग लेनिंगकडे आहे. आतापर्यंत मुंबई टीमची या स्पर्धेतील कामगिरी शानदार राहिली आहे. त्यांनी रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, आज वूमन्स प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यातही मुंबई इंडियन्सने तशीच कामगिरी करावी, अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...