WTC 2023 Final Ind vs Aus : रोहित शर्माने नाणेफेकीनंतर सांगितलं की, तो निर्णय घेणं जरा कठीण झालं, पण…

| Updated on: Jun 07, 2023 | 3:00 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र प्लेइंग इलेव्हन निवडणं कठीण असल्याचं सांगितलं आणि मनात नसताना तसा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

WTC 2023 Final Ind vs Aus : रोहित शर्माने नाणेफेकीनंतर सांगितलं की, तो निर्णय घेणं जरा कठीण झालं, पण...
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशपिच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु झाला आहे. रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू असलेल्या आर. अश्विनला स्थान दिलं नाही. त्याऐवजी संघात रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आलं आहे. हा निर्णय घेणं कठीण होतं असं मत कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केलं आहे.

रोहित शर्मा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर म्हणाला की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. आम्ही चार जलग आणि एक स्पिनर गोलंदाजासह मैदानात उतरू. संघामध्ये फिरकीपटू जडेजा आहे. प्लेइंग 11 मध्ये अश्विनला न घेणं कठीण निर्णय होता. इतक्या वर्षात तो आमच्यासाठी सामना विजेता ठरला आहे. पण तुम्हाला संघासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करायच्या आहेत आणि शेवटी आम्ही तो निर्णय घेतला. रहाणे अनुभवी आहे. त्याने 80 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो काही काळासाठी बाहेर होता पण त्याचा अनुभव हे सर्व बदलू शकेल.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.