WTC 2023 Final Ind vs Aus : विराट कोहलीला वाटतंय ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूची भीती, स्पष्टच म्हणाला..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. सामन्यात काही खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याबाबत विराट कोहलीनेही आपलं मत मांडलं आहे.

WTC 2023 Final Ind vs Aus : विराट कोहलीला वाटतंय ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूची भीती, स्पष्टच म्हणाला..
WTC 2023 Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू बजावणार महत्त्वाची भूमिका! सामन्यापूर्वीच विराट कोहलीने व्यक्त केली भीतीImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 2:06 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया समोरासमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज आहेत. यंदा भारत जेतेपदावर नाव कोरेल असे खेळाडू संघात आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया कधीही बाजी पलटवू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू ताकही फुंकून पित आहेत. आयसीसीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूबाबत भीती व्यक्त केली आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर घातक ठरू शकतो असं भाकित वर्तवलं आहे.

“डेव्हिड वॉर्नर हा इम्पॅक्ट प्लेयर असेल ऑस्ट्रेलियासाठी. जेव्हा वॉर्नरची बॅट चालते तेव्हा त्याला थांबवणं खूपच कठीण आहे. तो मैदानात असला की सामना आपल्याकडून खेचून नेण्याची ताकद ठेवतो. त्याला माहिती असतं कधी चौकार ठोकायचा आणि त्याला थांबवणं कठीण आहे. विशेष म्हणजे तो खेळाताना जास्त चुका करत नाही. “, असंही विराट कोहली याने सांगितलं आहे.

“डेव्हिड वॉर्नर कायम ऑस्ट्रेलियासाठी इम्पॅक्टफुल इनिंग खेळला आहे. प्रत्येक फॉर्मेटमध्ये त्याने आपली छाप सोडली आहे. त्यामुळे इतर संघांसाठी तो कायम घातक खेळाडू ठरला आहे.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.