WTC 2027, NZ vs WI: वेस्ट इंडिजला विजयासाठी 319 धावांची गरज, न्यूझीलंडला हव्यात 6 विकेट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिजविरुद्ध यांच्यात सामना होत आहे. हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. वेस्ट इंडिजला 319 धावा आणि न्यूझीलंडला 6 विकेटची गरज आहे. चौथ्या दिवशी काय झालं ते जाणून घ्या.

WTC 2027, NZ vs WI: वेस्ट इंडिजला विजयासाठी 319 धावांची गरज, न्यूझीलंडला हव्यात 6 विकेट
WTC 2027, NZ vs WI: वेस्ट इंडिजला विजयासाठी 319 धावांची गरज, न्यूझीलंडला हव्यात 6 विकेट
Image Credit source: Windies Cricket Twitter
| Updated on: Dec 05, 2025 | 3:45 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 या स्पर्धेत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज आमनेसामने आले आहेत. या सामन्याचा निकाल आता पाचव्या दिवसापर्यंत पोहोचला आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडला 6 विकेट्सची आणि वेस्ट इंडिजला 319 धावांची गरज आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 231 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 167 धावा केल्या. पहिल्या डावात न्यूझीलंडकडे 64 धावांची आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 8 गडी गमवून 466 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यासह न्यूझीलंडने एकूण 530 धावा केल्या आणि विजयासाठी 531 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान वेस्ट इंडिजसमोर खूपच कठीण आहे. पण वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमवून 2212 धावा केल्या. अजूनही वेस्ट इंडिज 319 धावांनी पिछाडीवर आहे.

वेस्ट इंडिजचा दुसरा डाव

कसोटी विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी जॉन कॅम्पेल आणि टॅगनरीन चंद्रपॉल ही जोडी मैदानात उतरली होती. पण 24 धावा असताना पहिला धक्का बसला. जॉन कॅम्पेल 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॅगनरीन चंद्रपॉल 6 धावांवर असताना विकेट पडली. त्यामुळे वेस्ट इंडिजची 25 धावांवर दुसरी विकेट पडली. त्यानंतर एलिक एथान्झे 5 धावा करून तंबूत परतला. तर रोस्टन चेसही फार काही करू शकला नाही. तो देखील 4 धावा करून बाद झाला. पण शाई होप आणि जस्टीन ग्रीव्ह्स यांनी डाव सावरला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शाई होप नाबाद 116 आणि जस्टीन ग्रीव्ह्स नाबाद 55 धावांवर खेळत आहे.

न्यूझीलंडला हा सामन्यात विजय मिळवायचा असेल तर पाचव्या दिवशी 6 विकेट घेणं गरजेचं आहे. जेकब डफीने 19 षटकात 65 धावा देत 2 गडी बाद केले. तर मॅट हेन्री आणि मायकल ब्रेसवेल याने प्रत्येकी एक गडी बाद केला. या व्यतिरिक्त झॅकरी फॉल्क्स आणि रचिन रविंद्र यांना मात्र यश मिळालं नाही. त्यामुळे आता पाचव्या दिवशी कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे. हा सामना ड्रॉ होणार का? न्यूझीलंड की वेस्ट इंडिज जिंकणार याकडे लक्ष असेल. हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिलं स्थान गाठेल.