WTC Final Weather Update : पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधून ताजी माहिती समोर

| Updated on: Jun 22, 2021 | 2:16 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) पहिल्या दिवशीपासून पावसाचा व्यत्यय सुरुच आहे. पहिल्या दिवशीप्रमाणे चौथ्या दिवशीचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला.

WTC Final Weather Update : पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधून ताजी माहिती समोर
southampton Weather
Follow us on

WTC Final Weather Update : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्य दिवशीचा संपूर्ण खेळ पाऊस असल्यामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर चौथ्यादिवशीचा खेळही रद्द करण्यात आला. दुसऱ्या दिवशीही ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळच सामना पार पडला त्यामुळे 4 दिवसांच्या सामन्यात आतापर्यंत दीड दिवसाचा खेळच पार पडला असल्याने सामन्यात कोणताही ठोस निर्णय समोर आला नसून क्रिकेट रसिकही नाराज झाले आहेत.(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 5th day Updates from Southampton ground)

दरम्यान सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आजच्या पाचव्या दिवसावरही पावसाचे संकट घोंगावत असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे. भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला असून न्यूझीलंडच्या संघाची सद्या फलंदाजी सुरु आहे. रॉस टेलर आणि केन विल्यमसन फलंदाजी करत असून 101 धावांवर न्यूझीलंडच्या केवळ 2 विकेट्सच गेल्या आहेत.

पाचव्या दिवसावरही घोंगावतायत ‘काळे ढग’

सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आज 22 जून रोजीदेखील साऊदम्पटनमध्ये पावासाचे आसार असून सर्वत्र काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे खेळ सुरु केल्यास पावासाचा व्यत्यय असल्याने सामना सुरु होण्याच्या आशा आता कमी झाल्या आहेत. WTC Final चा सामना 360 ओव्हरचा खेळवला जाणार होता. मात्र आतापर्यंत केवळ 141.1 ओव्हरचाच खेळ झाला आहे.

रिजर्व्ह डे बाबत आयसीसीकडून महत्त्वाची माहिती

सामन्यात कोणताही व्यत्यय आल्यास आयसीसीने सामना सुरु होण्याआधीच 23 जून हा दिवस राखीव ठेवला होता. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता राखीव दिवशी खेळ खेळवावा लागणार असल्याने या दिवशीच्या तिकीट आणि प्रवेशांबाबत आयसीसीने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं की, ‘सहाव्या दिवशी खेळवल्या जाणाऱ्या खेळाच्या तिकीटांचे दर कमी केले जाणार आहेत. तसेच ब्रिटनमध्ये होणाऱ्या सामन्यांची ही स्टँडर्ड प्रैक्टिस असल्याने केवळ ब्रिटनच्या नागरिकांनाच सामन्याला येण्याची परवानगी दिली जाईल.’

हे ही वाचा :

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

IND vs NZ WTC Final | महामुकाबल्यात पावसाचं विघ्न, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, क्रिकेटप्रेमी नाराज

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 5th day Updates from Southampton ground)