IND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा ‘पंच’, मग फलंदाजांनी तंगवलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. आज सामन्याच्या तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला.

IND vs NZ WTC Final : तिसरा दिवस किवींचा, आधी जेमिसनचा 'पंच', मग फलंदाजांनी तंगवलं
New Zealand Team
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 20, 2021 | 11:51 PM

साऊथॅम्प्टन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. आज सामन्याच्या तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. आज दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे अद्याप 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला आज 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आले. त्याऊलट न्यूझीलंडने आज पहिल्या 28 षटकांमध्ये भारताचे 7 गडी बाद केले, त्या बदलल्यात भारताला केवळ 71 धावा करता आल्या.

न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये आटोपला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने 44 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला फार काळ मैदानात टिकता आलं नाही. न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काईल जेमिनसनने उत्कृष्ट गोलंदाजी करत अर्धा भारतीय संघ (5 बळी) बाद केला. त्याला ट्रेंट बोल्ट आणि वॅगनरने प्रत्येकी 2 बळी घेत चांगली साथ दिली.

त्यानंतर फलंदाजी करणाऱ्याने न्यूझीलंडच्या संघाने संयमी खेळ करत 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिला विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर टॉम लॅथम 30 धावांवर बाद झाली. पुढे कर्णधार केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यानी धावफलक हलता ठेवत संघाला शंभरी पार करुन दिली. कॉनवे याने संयमी अर्धशतक झळकावत संघाची सामन्यावरील पकड मजबूत करुन दिली. आजच्या दिवसातील अखेरच्या षटकात इशांत शर्माने कॉनवेचा काटा काढला, त्याने 153 चेंडूत 54 धावा केल्या. कर्णधार विलियमसन 12 धावांवर नाबाद आहे. त्याच्या जोडीला रॉस टेलर मैदानात आला आहे. त्याने अद्याप खातं उघडलेलं नाही.

रहाणेला खास ‘प्लॅन’ करुन केलं बाद

एकीकडे जॅमिसन सर्व महत्त्वाचे विकेट्स मिळवत असताना त्याला पुरुन उरला होता तो एकमेव अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). त्यामुळे अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने एक खास युक्ती वापरली.  रहाणे 100 हून अधिक बॉल खेळला होता. बराच काळ क्रिजवर असणाऱ्या रहाणने 46 धावांवर असताना स्केवर लेगला एक उत्कृष्ट शॉट खेळत 3 धावा केल्या. ज्यानंतर तो केवळ 1 धाव दूर होता आपल्या अर्धशतपासून त्याच वेळी रहाणे हात खोलतो आहे हे कळताच न्यूझीलंडने स्केवर लेगला आणखी एक खेळाडू ठेवत तब्बल पाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी ठेवले. त्यानंतरच्याच नील वॅगनरच्या बॉलवर रहाणेने पुन्हा पुल शॉट खेळला जो थेट लॅथम याच्या हातात गेला आणि रहाणे बाद झाला.

संबंधित बातम्या

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें