AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

World Test Championship Final 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जर ड्रॉ झाला तर भारताला मोठा तोटा होणार आहे, तर न्यूझीलंडला फायदा होणार आहे.

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!
WTC Final
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 10:06 AM
Share

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्याची (WTC Final 2021) जगभरातील क्रिकेट रसिक बऱ्यांच दिवसांसून वाट पाहत होते. या फायनल सामन्यासाठी आतापर्यंत दोन्ही संघांनी कष्ट घेतले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी बजावली. हा अंतिम सामना रोमांचक होण्याची अपेक्षा होती, परंतु साऊथॅम्प्टनच्या हवामानाने अंतिम सामन्याची माती केली. पावसाने क्रिकेट रसिकांच्या आनंदावर विरजन पडलं. (World Test Championship Final 2021 If the match is draw India will loss)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलचा आजचा चौथा दिवस आहे. यातून पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे न्हावून निघाला. दोन्ही दिवशी एकही बॉल फेकला गेला नाही. तर दुसर्‍या दिवशी खराब प्रकाशामुळे नियोजित वेळेपूर्वीच सामना थांबवावा लागला. आतापर्यंत फक्त तिसर्‍या दिवसाचे खेळ पूर्णत: खेळला गेला आहे. चार दिवसांच्या खेळामध्ये फक्त 141.1 षटकं फेकली गेली आहेत.

फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला तोटा!

सामन्यात आतापर्यंत एका संघाचा एक डाव संपला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण भेटलेल्या भारतीय संघाने सर्वबाद 217 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल न्‍यूझीलंड संघाने दोन विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत. म्हणजेच 116 धावा न्यूझीलंड संघ पिछाडीवर आहे. सामन्याचा चौथा दिवस असल्याने हा सामना ड्रॉ च्या दिशेने चाललेला आहे. अशात जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेत्याच्या रूपात घोषित केलं जाईल. परंतु जर सामना ड्रॉ झाला तर भारतीय संघाला सर्वाधिक तोटा होण्याची शक्यता आहे.

…तर भारताची ही संधी जाणार, तोटा होणार!

जर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि न्यूझीलंड संयुक्त विजेते ठरले तर आयसीसी टॉप रँकिंगमध्ये टॉप वर जाण्याची भारताची संधी हातातून जाईल. भारतीय संघ क्रमवारीत दोन नंबरच्या स्थानावर राहिल. 123 रेटिंग पॉईंट्ससह न्यूझीलंड पहिल्या स्थानावर राहिल आणि 122 रेटिंग पॉइंट्ससह भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्याच वेळी जर भारतानं वर्ल्ड चॅम्पियनशिप चा अंतिम सामना जिंकला तर ट्रॉफीबरोबरच भारताला रेटिंग पॉईंट मध्ये देखील फायदा होईल.

न्यूझीलंड फायद्यात!

124 रेटिंग पॉइंट्ससह न्यूझीलंडला धोबीपछाड देऊन भारत पहिल्या स्थानावर पोहोचेल तर वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरल्यानंतर न्यूझीलंड 121 रेटिंग पॉईंटसह क्रमवारीत घसरण होऊन दोन नंबरला पोहचेल. जर अंतिम सामना जिंकला तर 126 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर न्यूझीलंडची दादागिरी आहे अशी राहिल. भारताचा मात्र तोटा होऊन 120 रेटिंग पॉइंट्स दुसऱ्या स्थानावर राहील म्हणजेच अंतिम सामना जर झाला तर भारताला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

(World Test Championship Final 2021 If the match is draw India will loss)

हे ही वाचा :

IND vs NZ WTC Final | महामुकाबल्यात पावसाचं विघ्न, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, क्रिकेटप्रेमी नाराज

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

IND vs ENG Womens Match : भारत ‘या’ खेळाडूमुळे वाचवू शकला इंग्लंड विरोधातील टेस्ट, ड्रॉ झालेल्या चुरशीच्या सामन्यात स्लेजिंग झाल्याचाही खुलासा

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.