IND vs ENG Womens Match : भारत ‘या’ खेळाडूमुळे वाचवू शकला इंग्लंड विरोधातील टेस्ट, ड्रॉ झालेल्या चुरशीच्या सामन्यात स्लेजिंग झाल्याचाही खुलासा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: shashank patil

Updated on: Jun 21, 2021 | 6:45 PM

तब्बल सात वर्षानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळला. इंग्लंड विरोधात खेळलेली ही कसोटी नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियाने ड्रॉ करण्यात यश मिळवलं आहे

IND vs ENG Womens Match : भारत 'या' खेळाडूमुळे वाचवू शकला इंग्लंड विरोधातील टेस्ट, ड्रॉ झालेल्या चुरशीच्या सामन्यात स्लेजिंग झाल्याचाही खुलासा
स्नेह राणा फलंदाजी करताना

ब्रिस्टल : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women Cricket Team) सात वर्षानंतर पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. इंग्लंडसारख्या तगड्या संघाविरोधात भारताच्या महिलांनी कडवी झुंज देत सामना अनिर्णीत केला. विशेष म्हणजे भारतीय संघातील पदार्पण करणाऱ्या महिला खेळाडूंनी ही अप्रतिम कामगिरी केली आहे. सामन्याच्या अखेरीस स्नेह राणा (Sneh Rana) आणि तानिया भाटिया (Taniya Bhatia) या दोघींनी अप्रतिम फलंदाजी करत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. यात नाबाद 80 धावांची खेळी करणाऱ्या स्नेह राणाने सर्वांचीच मनं जिंकली. तिने गोलंदाजी करतानाही 4 विकेट्स मिळवल्याने तिच्यामुळेच भारतीय संघ या सामन्यात पराभूत होण्यापासून वाचला. राणाला सोबत देत यष्टीरक्षक भाटियाने केलेल्या 44 धावाही महत्त्वाच्या ठरल्या. (IND vs ENG Women Test Match Drawn Sneh Rana And Shefali Sharma Along with dipti Sharma Played Crucial Role Agaisnt English players Bowling Attack and Sledging)

दरम्यान या दोघींसह सलामीच्या सामन्यात खेळणाऱ्या शेफाली वर्माने पहिल्या डावांत 96 आणि दुसऱ्या डावात 63 धावा केल्या. तर दीप्ति शर्माने नाबाद 29 आणि 54 धावांसह तीन विकेट्स पटकावले. या ड्रॉसोबतच भारतीय महिलांनी इंग्लंडमध्ये पराभूत न होण्याचा आपाल रेकॉर्डही कायम ठेवला. दरम्यान अखेरच्या दिवसी भारतीय महिला बाद होत नसल्याने इंग्लंडच्या महिलांनी स्लेजिंग करुन भारतीय महिलांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

राणाने केला खुलासा

भारताला सामना पराभूत होण्यापासून वाचवणाऱ्या स्नेह राणाने सामन्यानंतर प्रसार माध्यामांशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही आऊट व्हावं म्हणून आम्हाला त्रास देण इंग्लंडच्या महिला खेळाडूंच कामच होतं. आम्हाला बाद करुन सामना जिंकण्यासाठी त्या बऱ्याच गोष्टी करत होत्या. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता, प्रत्येक बॉलनंतर सहखेळाडूशी बोलून आत्मविश्वास वाढवला आणि सामना शेवटपर्यंत घेऊन गेलो.’

दीप्ति शर्मानेही केली कमाल

सामन्यात स्नेह राणाच्या अप्रतिम खेळीसोबतच दीप्ति शर्माने देखील वाखाणण्याजोगी खेळी केली. पहिल्या डावात नाबाद 29 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावांत दिप्तीने वरच्या फळीत येऊन 54 धावा केल्या. सोबतच महत्त्वाच्या तीन विकेट्स देखील दीप्तीने घेत सामन्यात कमाल केली.

हे ही वाचा

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

ICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला

Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे

(IND vs ENG Women Test Match Drawn Sneh Rana And Shefali Sharma Along with dipti Sharma Played Crucial Role Agaisnt English players Bowling Attack and Sledging)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI