AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेने उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, मोर्चा नंतर पण त्याआधी आज संध्याकाळापासूनच..

MNS Support CJP Protest : . भाजपच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेले दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा जोरदारपणे सक्रीय झाले आहेत. गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी दोघे पुन्हा कामाला लागले आहेत.

MNS : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेने उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, मोर्चा नंतर पण त्याआधी आज संध्याकाळापासूनच..
Sandeep Deshpande
| Updated on: Jul 23, 2026 | 2:45 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंनी येत्या 26 जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर हा मार्च निघणार आहे. ठाकरे गटाने या मोर्चात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. भाजपच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेले दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा जोरदारपणे सक्रीय झाले आहेत. गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी दोघे पुन्हा कामाला लागले आहेत. एक सरकारविरोधात जनमत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण भाजपच्या विस्ताराचा सर्वाधिक फटका या दोघांनाच बसला आहे.

26 जुलैला आंदोलन होईलच. पण त्याआधी मनसेने एक नवीन मोहिम सुरु केली आहे. ‘एक सही पाठिंब्याची’ असं या मोहिमेचं नाव आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानात ही मोहिम राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी या मोहिमत सहभागी व्हावं असं आवाहन मनसेने केलं आहे. “विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी पक्षातर्फे नाही तर एक नागरिक म्हणून या मोहिमेचं आयोजन केलं आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे समर्थक असाल किंवा विरोधी पक्षाचे हा विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. कुठलही राजकारण यात नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.

ते दिल्लीत सीजेपीच्या स्टेजवर गेले

दोन्ही ठाकरे बंधु आता सीजेपीने सुरु केलेल्या या आंदोलनात सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मागच्या रविवारी दादर शिवाजी पार्कमध्ये अभिजीत दीपकेला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीत सीजेपीच्या स्टेजवर गेले. अभिजीत दीपके आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आता रविवारी भव्य मोर्चा काढणार आहे. एकूणच दोन्ही ठाकरे बंधुंचा सरकार विरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न दिसत आहे. ‘एक सही पाठिंब्याची’ ही मोहिम सुद्धा त्याच रणनितीचा एक भाग आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...