WTC Final final | Ajinkya Rahane याचं अर्धशतक, एकट्याने ऑस्ट्रेलियाला रडवलं

| Updated on: Jun 09, 2023 | 4:49 PM

Ajinkya Rahane Wtc Final 2023 Day 3 | अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या दिवशी सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलंय.

WTC Final final | Ajinkya Rahane याचं अर्धशतक, एकट्याने ऑस्ट्रेलियाला रडवलं
Follow us on

लंडन | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी अर्धशतक ठोकलंय. टीम इंडिया अडचणीत असताना रहाणेने निर्णायक क्षणी अर्धशतक पूर्ण केलंय. विशेष गोष्ट म्हणजे रहाणेने 74 मीटर लांब सिक्स ठोकत 50 धावांचा टप्पा गाठला. रहाणेने 92 बॉलमध्ये 52 धावा पूर्ण केल्या.

रहाणेने या अर्धशतकादरम्यान 1 सिक्स आणि 6 चौकार ठोकले. रहाणेच्या कसोटी कारकीर्दीतील 26 वं अर्धशतक ठरलं. रहाणेच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाचा डाव सावरलाय. रहाणे आता पूर्णपणे सेट झालाय. त्यामुळे रहाणेने या अर्धशतकाचं रुपांतर मोठ्या खेळीत करावं, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

रहाणेचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध झुंजार अर्धशतक

जडेजासोबत अर्धशतकी भागीदारी

टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी झटपट विकेट्स गमावले. रोहित शर्मा-शुबमन गिल सलामी जोडी अपयशी ठरली. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनीही घोर निराशा केली. दोघेही प्रत्येकी 14 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली.

त्यानंतर रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 100 बॉलमध्ये 71 रन्सची पार्टनरशीप केली. या 71 धावांच्या भागीदारीत जडेजा याने 48 तर रहाणे याने 15 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर जडेजा 48 धावांवर आऊट झाला. त्यानंतर केएस भरत मैदानात आला. केएस आणि रहाणे दुसऱ्या दिवशी नाबाद परतले. मात्र तिसऱ्याच दिवशी मैदानात येताच दुसऱ्या बॉलवर केएस आऊट झाला.

शार्दुल-रहाणे जोडी हिट

केएसनंतर शार्दुल मैदानात आला. शार्दुलने याआधीही ओव्हलवर अर्धशतक ठोकलंय. त्यामुळे शार्दुलकडून चांग्लाय खेळीची अपेक्षा होती. शार्दुलने निराशा केली नाही. शार्दुलने रहाणेला चांगली साथ दिली. या दोघांनी टीम इंडियासाठी 75 पेक्षा अधिक धावांची नाबाद भागीदारी केली आहे. त्यामुळे या जोडीकडून टीम इंडियाला चांगल्या आणि मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.