WTC 2023 Final Live Streming | टेस्ट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: May 31, 2023 | 11:55 PM

आयपीएल 16 वा मोसम संपल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचे (wtc final 2023 live stremimg) वारे वाहू लागले आहेत. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याबाबत जाणून घ्या सर्वकाही.

WTC 2023 Final Live Streming | टेस्ट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या टेस्ट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया आणि कांगारु या दोन्ही संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. या महामुकाबल्यात रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा ही पॅट कमिन्स याच्या खांद्यावर आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा पोहचली आहे. तर ऑस्ट्रेलियाची ही पहिली वेळ आहे. या सामन्यानिमित्त आपण सर्वकाही जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल केव्हा?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामना हा 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून राखीव दिवस असणार आहे.

सामन्याचं आयोजन कुठे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द ओव्हल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील या महामुकाबल्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

लाईव्ह सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

डीजीटल स्ट्रीमिंग कुठे बघता येणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला हा मोबाईल आणि लॅपटॉपवर हॉटस्टार एपच्या मदतीने पाहता येईल.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.