AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 फायनलआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी, नक्की काय झालं?

World Test Championship Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप महाअंतिम सामन्याला आता एका आठवड्यापेक्षा कमी वेळ राहिलाय. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याी डोकेदुखी वाढली आहे.

WTC Final 2023 फायनलआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी, नक्की काय झालं?
| Updated on: May 31, 2023 | 9:07 PM
Share

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल सामन्याला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हलमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएल 16 वा मोसम संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आता लंडनमध्ये पोहचले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सरावाला लागले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या खेळाडूंचे फोटो ट्विट केले आहेत. या दरम्यान टीम इंडियाची आणि पर्यायाने कॅप्ट रोहित शर्माची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या महामुकाबल्याआधी ऑस्ट्रेलियाचा घातक खेळाडू हा दुखापतीतून सावरला आहे. या खेळाडूच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता हा खेळाडू फीट झाल्याचं समजत आहे.

जॉश हेझलवूड आयपीएल 16 व्या मोसमातून माघारी परतला होता. मात्र आता हेझलवूड टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. जोश दुखापतीमुळे आयपीएल 16 व्या मोसमात आरसीबीकडून 3 सामने खेळला होता. जोश टीम इंडिया विरुद्ध फेब्रुवारी-मार्च महिन्यात कसोटी आणि वनडे सीरिजही खेळू शकला नव्हता.

दुखापतीमुळे बेजार

जॉश हेझलवूड याने गेल्या 2 वर्षात साईड स्ट्रेन इंजरीचा सामना केला आहे. जॉशला या दुखापतीमुळे 2021-22 मध्ये एशेज मालिकेतील 4 कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं. तसेच विंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतही खेळता आलं नव्हतं. आता जॉश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळण्यासाठी कितपत तयार आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?