WTC Final 2023 च्या एकदिवसआधी Rohit Sharma याला दुखापत, टीम इंडियासाठी वाईट बातमी

Rohit Sharma Injury Wtc Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023 च्या महाअंतिम सामन्याआधी टीम इंडियाच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाली आहे.

WTC Final 2023 च्या एकदिवसआधी Rohit Sharma याला दुखापत, टीम इंडियासाठी वाईट बातमी
| Updated on: Jun 06, 2023 | 5:16 PM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं काउंटडाऊन सुरु झालंय. आता या महाअंतिम सामन्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ बाकी राहिलाय. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये या टेस्ट वर्ल्ड कपसाठी लढाई असणार आहे. या महाअंतिम सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार सराव केला आहे. दोन्ही टीम आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे.

त्यामुळे आता कोण वर्ल्ड चॅम्पियन होणार, याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागून राहिलं आहे. या दरम्यान टीम इंडियाच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला दुखापत झाली आहे. रोहित शर्मा याला या दुखापतीमुळे या महत्वाच्या सामन्यातून मुकावं लागतंय की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रोहित शर्मा याला दुखापत

रोहित शर्माला दुखापत

रोहित शर्मा याला सरावादरम्यान दुखापत झालीय. रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहितला सराव सोडून मैदानाबाहेर जावं लागंल. दुखापतीनंतर रोहित ताडकन मैदानाबाहेर गेल्याने दुखापत गंभीर आहे की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यानंतर काही वेळाने रोहित मैदानात परत आला.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झालेत. या फोटोंमध्ये रोहितच्या हाताच्या बोटांना बँडेज लावलेले आहेत. बीसीसीआयकडून रोहितच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रोहितला झालेली ही दुखापत फारशी गंभीर नसावी, तसेच रोहित यातून लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहते आता करत आहेत.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.