WTC Final 2025 : ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेने संघ केला जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. ऑस्ट्रेलियाने मागच्या पर्वात भारताचा पराभव करून जेतेपद पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी दक्षिण अफ्रिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

WTC Final 2025 : ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेने संघ केला जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी
टेम्बा बावुमा
Image Credit source: Twitter
| Updated on: May 13, 2025 | 4:20 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना 11 जून रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दक्षिण अफ्रिकन संघाने मागच्या दोन वर्षात कसोटीत जबरदस्त कामगिरी केली आहे. दक्षिण अफ्रिकेचे 69.44 विजयी टक्केवारी असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. या सामन्यात क्रीडाप्रेमींच्या मते ऑस्ट्रेलियाचा संघ भारी आहे. पण ऑस्ट्रेलियाला तगडं आव्हान देण्याची ताकद दक्षिण अफ्रिका संघाकडे आहे. दक्षिण अफ्रिकन संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी वगळता एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेकडे आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या सामन्यासाठी दक्षिण अफ्रिकने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टेम्बा बावुमा संघाचं नेतृत्व करणार आहे. तर वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याचं संघात पुनरागमन झालं आहे. कमरेच्या दुखापतीमुळे मागच्या काही मालिकांमध्ये त्याने भाग घेतला नव्हता. मात्र आता पूर्णपणे फिट झाला असून अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे.

दक्षिण अफ्रिकेने संघ निवडताना अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. पाकिस्तान विरुद्ध निवडलेला कसोटी संघ असून त्यात फक्त दोन बदल केले आहेत. युवा खेळाडू क्वेना मफाकाला डावललं आहे. तर टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्जकेला वगळलं आहे. संघात टोनी डी जोरजी, रयान रिकेल्टन आणि एडेन मार्करम टॉप ऑर्डर फलंदाज आहेत. तर युवा फलंदाज म्हणून ट्रिस्टन स्टब्स, डेविड बेडिंगम आणि बावुमा मधल्या फळीत फलंदाजी करतील. विकेटकीपर म्हणून काइन वेरीन असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून वियाम मुल्डर आणि मार्को यानसेनची निवड केली आहे. वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन आणि कॉर्बिन बॉश आहेत. तर फिरकीची जबाबदारी केशव महाराज आणि सेनुरन मुथुसामीवर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, एडेन मार्करम, वियान मुल्डर, मार्को यानसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, काइल व्हेरेन, डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, सेनुरन मुथुसामी, डेन पॅटरसन.