Dope Test: यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्मा गोत्यात, NADA ने पाठवली नोटीस; बीसीसीआयकडे तक्रार

क्रीडाक्षेत्रातील अनेक खेळाडू डोप टेस्टच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे त्याची टेस्ट कधीही केली जाऊ शकते. त्यामुळे या टेस्टला कोणीही नकार देऊ शकत नाही. यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्माही या टेस्टचा भाग आहेत. पण त्यांनी एक चूक केली आणि आता गोत्यात आले आहेत.

Dope Test: यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्मा गोत्यात, NADA ने पाठवली नोटीस; बीसीसीआयकडे तक्रार
Dope Test: यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्मा गोत्यात, NADA ने पाठवली नोटीस; बीसीसीआयकडे तक्रार
Image Credit source: PTI
| Updated on: May 09, 2026 | 3:38 PM

आयपीएल 2026 स्पर्धात आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे महिला क्रिकेट संघ टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. असं असताना भारतीय क्रिकेट जगतात एका बातमीने खळबळ उडाली आहे. कारण राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जयस्वाल आणि महिला संघाची युवा ओपनर शफाली वर्माविरुद्ध डोप टेस्टबाबत तक्रार करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेटचे हे दोन्ही स्टार खेळाडू डोप टेस्टसाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसीकडे तक्रार करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, नॅशनल अँटी डोपिंग एजेंसीने (NADA) दोन्ही खेळाडूंना टेस्टसाठी डिसेंबरमध्ये न आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नाडाच्या रजिस्टर्ड टेस्टिंग पूलमध्ये सहभागी असलेल्या काही भारतीय क्रिकेटपटूंमध्ये शफाली वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश होता.

नाडाच्या यादीत समाविष्ट असलेल्या दरवर्षी त्यांच्या वेळेची आणि ते कोठे असतील याची आगाऊ माहिती देणे बंधनकारक आहे. जर ते तिथे आढळले नाहीत, तर त्यांना नोटीस पाठवली जाते. याला ‘कुठे उपस्थित राहण्याच्या अटी’चे (Whereabout clause) उल्लंघन म्हटले जाते. यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्मा यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. अहवालानुसार, 17 डिसेंबर रोजी जेव्हा डोप कंट्रोल अधिकारी चाचणी घेण्यासाठी आले. तेव्हा यशस्वी जयस्वाल पूर्वनिश्चित ठिकाणी उपस्थित नव्हता. असंच शफाली वर्माच्या बाबतीत झालं. 7 नोव्हेंबरला पूर्वनियोजित ठिकाणी नव्हती, त्यामुळे तिची चाचणी घेता आली नाही. त्यानंतर 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी प्रतिसाद देण्यास सांगणीरा नोटीस पाठवली गेली. मात्र या नोटीशीलाही दोघांनी उत्तर दिलं नाही.

नाडाने या कृतीची गंभीर दखल घेतली असून ‘ठिकाणाची माहिती न देणे’ या श्रेणीअंतर्गत दोघांविरूद्ध तक्रार केली आहे. आता नाडाने आणखी एक नोटीस पाठवली असून सात दिवसात प्रतिसाद देण्यास सांगितलं आहे. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि बीसीसीआयलाही देण्यात आली आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि शफाली वर्मा यांच्यावर काय कारवाई होते? याकडे लक्ष लागून आहे. नियमानुसार, आयरटीपीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 12 महिन्यांच्या आत तीन संधी दिल्या जातात. तिन्ही वेळेस चालढकलपणा केला तर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. नाडाला समाधानकारक उत्तर देण्यास अपयशी ठरले तर दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते.

Follow Us