
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी यशस्वी जयस्वालला संघात काही स्थान मिळालं नाही. पण दोन खेळाडूंची दुखापत पाहता कधीही लॉटरी लागू शकते अशी स्थिती आहे. असं असूनही त्याला टी20 संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण यशस्वी जयस्वालने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मग ते आयपीएल असो की क्रिकेटचा कोणताही फॉर्मेट.. त्याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीम इंडियाच्या टी20 संघातील स्पर्धा पाहता यशस्वी जयस्वालला स्थान मिळणं कठीण झालं आहे. पण यशस्वी जयस्वालने आपल्या आक्रमक खेळीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक ठोकलं. पण हे शतक यशस्वी जयस्वालने ठोकलं तरी कधी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण यशस्वी जयस्वाल तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत होता. पण त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे या मालिकेत शतक ठोकण्याचा प्रश्नच येत नाही. त्याने सराव सामन्यातही असं काही केलं नाही. यशस्वीने ही कामगिरी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनच्या कार्यक्रमात केली.
इंग्लंडचा माजी कर्णधार पीटरसन हा दिग्गज खेळाडूंच्या मुलाखती घेत असतो आणि क्रिकेटशी निगडीत आव्हान देत असतो. असंच एक चॅलेंज पीटरसनने यशस्वी जयस्वालला दिलं होतं. यशस्वी जयस्वालने हे चॅलेंज पूर्ण केलं. इंग्लंडच्या स्थानिक मैदाना हे आव्हान पार पडलं. पीटरसनने यशस्वी जयस्वालला 50 चेंडूत 100 धावा करण्याचं आव्हान दिलं होतं. पण यात दोन अटी ठेवल्या होत्या. यात प्रत्येक चेंडूनंतर वेग 1 मैल प्रतितास वाढेल आणि दुसरं बाद झाल्यावर धावसंख्यातून 5 धावा वजा केल्या जातील. समोर कोणी गोलंदाज नव्हता तर एक मशिन होतं. तर क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू तैनात होते.
यशस्वी जयस्वालने चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. यात यशस्वी जयस्वाल दोन वेळा बाद झाला. त्यामुळे 10 धावा वजा करण्यात आला. चेंडूंचा वेग वाढत असल्याने काही चेंडू मारतात चुकला. पण जयस्वालन हे आव्हान पूर्ण केलं. 47 चेंडूत 100 धावांचं आव्हान पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालने 3 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. 47 व्या चेंडूवर षटकार मारला आणि शतक पूर्ण केलं. समोर मशिन असली म्हणून काय झालं. यशस्वीने वेगाचा सामना करण्यास सज्ज असल्याचं दाखवून दिलं. आता यशस्वी जयस्वाल टी20 संघात नाही. त्यामुळे थेट आयपीएल खेळताना दिसेल.