
टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वाल याने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी नाबाद 173 धावा केल्या होत्या. त्यामुळे यशस्वी दुसऱ्या दिवशी उर्वरित 27 धावा करुन तिसरं द्विशतक करेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र यशस्वी दुसऱ्या दिवशी 2 धावा केल्यानंतर रन आऊट झाला. यशस्वीसोबत कॅप्टन शुबमन गिल मैदानात होता. यशस्वीने फटका मारुन 1 धावेसाठी शुबमनला कॉल दिला. यशस्वीने फटका मारताच नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने धाव घेतली. मात्र शुबमनने यशस्वीला 10 मीटर धावून आल्यानंतर नकार दिला. त्यामुळे यशस्वीला नाईलाजाने पुन्हा माघारी जावं लागलं. त्यामुळे यशस्वी स्ट्राईक एंडला रन आऊट झाला. शुबमनने कॉलला दाद न दिल्याने यशस्वीचं द्विशतक हुकल्याचं म्हटलं जात आहे. अशात यशस्वीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हुकलेल्या द्विशतकाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यशस्वीने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
“शक्य तितकी मोठी खेळी करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी मैदानात असेल तर मला खेळ पुढे न्यायला हवा. तसेच शक्य तितका वेळ खेळायला हवं”, असं शुबमनने खेळाबाबत म्हटलं. यशस्वीने त्यानंतर रन आऊटबाबत प्रतिक्रिया दिली.
“हा एक खेळाचा भाग आहे, त्यामुळे मी याबाबत फार विचार करत नाही. मी काय मिळवू शकतो, मी याचाच सातत्याने विचार करत असतो. माझा कायम खेळात कायम राहण्याचा प्रयत्न असतो. तसेच माझा मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असतो”, असं यशस्वीने म्हटलं.
“खेळपट्टी फार चांगली आहे. आम्ही फार चांगली बॉलिंग करतोय. विंडीजला लवकरात लवकर पहिल्या डावात गुंडाळण्याचा प्रयत्न आहे”,असंही यशस्वीने नमूद केलं.
यशस्वी असा झाला रन आऊट
Shubman Gill had a chance to be a good captain today but he failed to do so, resulting in Yashasvi Jaiswal being run out.💔😭 pic.twitter.com/9b5csGWbqD
— CricSachin (@Sachin_Gandhi7) October 11, 2025
दरम्यान टीम इंडियासाठी यशस्वीने सर्वाधिक 175 धावांचं योगदान दिलं. तर शुबमन गिल याने नाबाद 129 धावा केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे पहिला डाव हा 5 बाद 518 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारताने विंडीजला खेळ संपेपर्यंत 4 झटके दिले. विंडीजने 140 धावा केल्या आहेत. विंडीज अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे तिसऱ्या दिवसातील खेळाकडे लाaगून आहे.