IND vs WI : शुबमनच्या चुकीमुळे द्विशतक हुकलं!, यशस्वी भर मैदानात कॅप्टनवर संतापला, पाहा व्हीडिओ
Yashasvi Jaiswal Run Out : यशस्वीने पहिल्या दिवशी चाबूक खेळी केली होती. तर दुसऱ्या दिवशी यशस्वी द्विशतक ठोकण्यासाठी सज्ज होता. मात्र एका चुकीमुळे यशस्वी रन आऊट झाला आणि त्याचं द्विशतक हुकलं.

टीम इंडियाने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला. भारताने 90 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 318 धावा केल्या होत्या. तर यशस्वी जैस्वाल आणि कॅप्टन शुबमन गिल या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. यशस्वीने 173 धावांपासून दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. यशस्वी आपल्या तिसऱ्या द्विशतकापासून फक्त 27 धावा दूर होता. त्यामुळे यशस्वी सहज द्विशतक करेल, असं वाटलं होतं. मात्र ज्याची भीती तेच झालं. यशस्वी रन आऊट झाला. त्यामुळे यशस्वीचं द्विशतकाचं स्वप्न भंगलं.
यशस्वी शुबमन यांच्यातील गडबडीमुळे विंडीजला तिसरी विकेट मिळाली. यशस्वी फटका मारताच धावत निघाला. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या शुबमनने यशस्वीला 10 मीटर धावून आल्यानंतर नकार दिला. त्यामुळे यशस्वीला पुन्हा स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत जावं लागलं. यात यशस्वी रन आऊट झाला. त्यामुळे यशस्वीचा संताप पाहायला मिळाला. नक्की काय झालं? हे आपण जाणून घेऊयात.
नक्की काय झालं?
जेडन सील्स भारताच्या डावातील 92 वी आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी ओव्हर टाकायला आला. यशस्वीने जेडनच्या ओव्हरमधील दुसर्या बॉलवर फटका मारला आणि 1 रनसाठी धावत सुटला. यशस्वी जवळपास नॉन स्ट्राईकवर पोहचलाच होता. मात्र नॉन स्ट्राईकवरील शुबमनने धावेसाठी नकार दिला. शुबमन जागेवरुन हटायला तयार नव्हता. त्यामुळे यशस्वीला पुन्हा त्याच वेगात स्ट्राईक एंडच्या दिशेने परतावं लागलं. मात्र तोवर गेम ओव्हर झाला होता. विकेटकीपर टेव्हीन इमलाचने टॅगनारायण चंद्रपॉल याने केलेला थ्रो अचूक टीपत यशस्वीला रन आऊट केलं.
यशस्वीला नकार देण्याऐवजी शुबमन स्वत: स्ट्राईक एंडच्या दिशेने निघाला असता तर कदाचित धाव पूर्णही झाली असती. मात्र तसं झालं नाही आणि यशस्वीचं पॅकअप झालं. यशस्वी रन आऊट झाल्यानंतर शुबमनवर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच नाही तर यशस्वीने स्वत:च्या डोक्यावर हात मारला.
..आणि यशस्वी जैस्वाल रन आऊट
Shubman Gill had a chance to be a good captain today but he failed to do so, resulting in Yashasvi Jaiswal being run out.💔😭 pic.twitter.com/9b5csGWbqD
— CricSachin (@Sachin_Gandhi7) October 11, 2025
द्विशतक हुकल्याने यशस्वी नाराज होऊन मैदानाबाहेर परतला. संपूर्ण मैदानात शांतता पाहायला मिळाली. यशस्वीने 258 बॉलमध्ये 22 फोरसह 175 रन्स केल्या. यशस्वी दुसर्या दिवशी केवळ 2 धावाच जोडू शकला.
दरम्यान यशस्वीची ही कसोटी कारकीर्दीतील तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यशस्वी जैस्वाल याची नाबाद 214 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यशस्वीने 2024 साली राजकोटमध्ये इंग्लंड विरुद्ध ही खेळी केली होती. त्यानतंर वायझॅगमध्ये इंग्लंड विरुद्धच 209 धावा केल्या होत्या.
