शाहिद आफ्रिदीच्या जावयाची ‘पीसीबी’तून निलंबन, कारण ऐकून शॉक व्हाल

शाहिद आफ्रिदीनं याआधी विराटला निवृत्तीसंदर्भात सल्ला दिला. मात्र, आता त्याच्याच जावायाचं संघातून निलंबन करण्यात आलंय.

शाहिद आफ्रिदीच्या जावयाची पीसीबीतून निलंबन, कारण ऐकून शॉक व्हाल
असिफ आफ्रिदी
Image Credit source: social
| Updated on: Sep 13, 2022 | 8:23 PM

नवी दिल्ली : विराट कोहलीला (Virat Kohali) निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या शाहिद आफ्रिदीच्या जावायाची पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डातून (Pakistan Cricket Board) हाकालपट्टी करण्यात आली आहे. यावरुन पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डात मोठा भूकंप झाल्याचं बोललं जातंय. शाहिद आफ्रिदीनं याआधी विराट कोहलीला निवृत्तीसंदर्भात एक सल्ला दिला होता. त्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या असिफ आफ्रिदीच्या (Asif Afridi) निलंबनाच्या बातमीनं पाकिस्तानच्या अंतर्गतच भूकंप झाल्याचं बोललं जातंय.

भ्रष्टाचाराचे आरोप

असिफ आफ्रिदीला भ्रष्टाचारप्रकरणी 12 सप्टेंबरला निलंबित करण्यात आलं होतं. पीसीबी लाचलुचपत प्रतिबंधक संहितेच्या कलमानुसार त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

PCBमध्ये भूकंप

आता झालं असं की टी-20 विश्वचषकासाठी संघ निवडी आधीच पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप झाल्याचं बोललं जातंय. क्रिकेटपटू आफ्रिदीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर हा भूकंप आला असून, त्याला आता निलंबित करण्यात आलं आहे. भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूशी संबंधित नसून पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटपटूशी संबंधित आहे.

सहभावर बंदी

निलंबन झाल्यानं आसिफ आफ्रिदीवर काही निर्बंधही आहेत. जोपर्यंत पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत नाही आणि काही तळापर्यंत पोहोचत नाही किंवा त्याला क्लीन चिट देत नाही तोपर्यंत तो कोणत्याही खेळात भाग घेऊ शकणार नाही.

14 दिवसांत उत्तर द्यावं लागणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितले की, आफ्रिदीला नोटीस बजावण्यात आली आहे. क्रिकेटशी संबंधित 2 कायदे तोडल्याबद्दल त्याला कलम 2.4 अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर त्याला 14 दिवसांत उत्तर द्यायचे आहे. पीसीबीने म्हटले आहे की, तपास सुरू आहे, या प्रकरणी असिफ सध्या अधिक भाष्य करू इच्छित नाहीत.

यापूर्वी आफ्रिदीचा अजब सल्ला

यापूर्वी असिफ आफ्रिदीच्या सासऱ्यानं म्हणजेच शाहिद आफ्रिदीनं विराट कोहलीला अजब सल्ला दिला. तो म्हणाला की विराटनं चांगली कामगिरी करतानाच क्रिकेटला अलविदा म्हणावं आणि संघ सोडू नये.

हे ट्विट वाचा…

समा टीव्हीसोबतच्या संवाद साधताना आफ्रिदी म्हणालाय. पण, आता त्याचाच जावायाची हाकालपट्टी झाली आहे.