AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuzvendra Chahal चा नादच खुळा, परदेशात घालतोय राडा, बोल्ड केलेला व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra Chahal County Cricket : भारतीय संघामध्ये जागा न मिळाल्याने सध्या काऊंटी क्रिकेट खेळत असलेल्या युजवेंद्र चहलने चमकदार कामगिरी केली आहे. बोल्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal चा नादच खुळा, परदेशात घालतोय राडा, बोल्ड केलेला व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Sep 12, 2023 | 8:53 AM
Share

मुंबई : टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संधी मिळाली नाही. नाराज झालेल्या चहलने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयनेही त्याला खेळण्याची परवानगी दिली होती. काऊंटी क्रिकेटमध्ये केंट संघाकडून चहलने डेब्यू करत पहिल्याच दिवशी राडा केला आहे. सोशल मीडियावर चहलने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युजवेंद्र चहलने नॉटिंगहॅमशायरच्या लिंडन जेम्सला चारीमुंड्य चीत केलं. चहलचा चेंडू डिफेंड करण्याच्या प्रयत्नात तो बोल्ड झाला. चहलच्या या चेंडूवर जेम्सकडे काहीच प्रत्युत्तर नव्हतं. चहलने फक्त एकच नाहीतर त्यानंतरही दोन विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. चहलने 52 धावा देत 3 विकेट घेतल्या.

पाहा व्हिडीओ-

केंट संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटींग करताना केंट संघाने 446 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर फलंदाजासाठी आलेल्या नॉटिंघमशार संघाची अवस्था खराब आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना पहिला धक्का बसला होता. त्यानंतर कर्णधार स्टिवन मुल्लानेयने ८६ धावा करत डाव सावरला होता. मात्र इतर कोणला मोठी खेळी करता आली नाही. चहलने आपला जलवा दाखवला, पठ्ठ्याने तीन विकेट घेतल्या.

दरम्यान, चहलला संघात जागा मिळावी अशी मागणी अनेक क्रिकेटपटूंनी केली आहे. 2021 साली  सुद्धा त्याला वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही. भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आता वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही त्याला स्थान न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.