IND vs WI: पोलार्ड कव्हर्सध्ये फटका मारायला गेला, पण… चहलने पोलार्डला कसं बनवलं मामा पाहा VIDEO

| Updated on: Feb 06, 2022 | 5:15 PM

चहलने सर्वप्रथन निकोलस पूरनला पायचीत पकडलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डला 'मामा' बनवलं.

IND vs WI: पोलार्ड कव्हर्सध्ये फटका मारायला गेला, पण... चहलने पोलार्डला कसं बनवलं मामा पाहा VIDEO
Follow us on

अहमदाबाद: भारताच्या युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (IND vs WI) प्रभावी गोलंदाजी केली. त्याने वेस्ट इंडिजची मधली फळी उद्धवस्त करताना एकूण चार विकेट घेतल्या. त्याच्या लेग ब्रेक, गुगलीच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकडे कुठलही उत्तर नव्हतं. युजवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना दोन स्लीप आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) शॉर्ट लेगला उभा होता. चहलने लागोपाठ वेस्ट इंडिजचे दोन महत्त्वाचे विकेट घेतले. मनगटी फिरकी गोलंदाज असलेल्या चहलने सर्वप्रथन निकोलस पूरनला पायचीत पकडलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डला ‘मामा’ बनवलं. आक्रमक फलंदाज असलेल्या पोलार्डला भोपळाही फोडू न देता तंबूत धाडलं. वेस्ट इंडिजला आज भारताची फिरकी गोलंदाजी खेळून काढण झेपलं नाही. होल्डरचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले.

कव्हरसमध्ये लॉफ्ट फटका खेळण्याच्या प्रयत्नात पोलार्ड चेंडूची दिशा चुकला व चेंडूने थेट स्टंम्पसचा वेध घेतला. आपल्यापावली पोलार्ड माघारी फिरला. वनडे फॉर्मेटमध्ये पोलार्ड शून्यावर बाद होण्याची ही 15 वी वेळ आहे. त्याने ब्रायन लारा, डवयेन स्मिथ आणि फिल सिमन्सला मागे सोडलं. ते 14 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

पोलार्ड चहलचा 101 वा विकेट ठरला. त्याआधी पूरनला बाद करुन चहलने वनडेमध्ये विकेटचं शतक पूर्ण केलं. त्याने 60 सामन्यात 100 विकेटचं शतक पूर्ण केलं. वेगवान 100 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने 56 सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली. वनडे 100 विकेटचा टप्पा पूर्ण करणारा चहल भारताचा 22 वा गोलंदाज आहे. तर फिरकी गोलंदाजांमध्ये नववा स्पिनर आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट काढण्याचा विक्रम आजही अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 269 वनडे सामन्यात 334 विकेट घेतल्या होत्या. 100 वी विकेट मिळवल्यानंतर चहलने आपल्या गुगली आणि लेग ब्रेकने वेस्ट इंडिजला आणखी झटके दिले.