
युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्याची जागा काही केल्या संघात तयार होत नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. असं असताना युजवेंद्र चहलचा एक विचित्र फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहील्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. युजवेंद्र चहलची स्थिती अशी का झाली? इतका हा भयावह फोटो पहिल्या नजरेत भासतो. पण तसं काही नाही. ऑप्टिकल इल्यूजन पॅटर्नमध्ये काढलेला फोटो आहे. यात जीभ बाहेर आलेली, डोळे फिरवलेले आणि डोक्याचा भाग दिसत आहे. युजवेंद्र चहलने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो युजवेंद्र चहलने इंग्लंडमधील एडिनबर्ग येथे काढला आहे. युजवेंद्र चहल इंग्लंडमधील एडिनबर्ग येथे कॅमेरा ऑब्स्क्युरा आणि वर्ल्ड ऑफ इल्युजन्सला भेट देण्यासाठी गेला होता. तिथे त्याने हा फोटो काढला.
या फोटोत एक टेबल दिसत आहे. ऑप्टिकल इल्युजनसाठी या टेबलवर एक हात आहे. टेबलचा खालचा मागच्या बाजूला रंगसंगतीत जुळवला आहे. त्यामुळे टेबलावर फक्त युजवेंद्र चहलची मुंडकं ठेवलं आहे असं वाटतं. त्यात युजवेंद्रने जीभ बाहेर काढली आणि डोळे फिरवले आहेत. त्यामुळे ही मान कापून टेबलवर ठेवली असा भास होतो. पण प्रत्यक्षात तसं काही नाही. पण हा फोटो पहिल्यांदा पाहीलं की भीतीने थरकाप उडतो. पण व्यवस्थित पाहीलं की शंकेचं निरसन होतं.
युजवेंद्र चहलचा हा फोटो पाहिल्यानंतर भीती वाटण्याचं कारण म्हणजे नुकतं त्याने पॉडकास्ट धक्कादायक खुलासे केले होते. यात घटस्फोटानंतर आत्महत्येचा विचार आल्याचं सांगितलं होतं. 23 जुलै रोजी युजवेंद्र चहलने लंडनमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी आरजे महवश त्याच्यासोबत होती. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा युजर्सने महवशला घर तोडणारी म्हटले होते.
युजवेंद्र चहल गेल्या अनेक दिवसांपासून इंग्लंडमध्ये आहे. काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. युजवेंद्र चहलने इंग्लिस काउंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. यात डर्बीशायरविरुद्धच्या एका डावात घेतलेले 6 विकेट्सचा समावेश आहे.